त्वचेपासून ते पोटापर्यंत रामबाण उपाय जिऱ्याचे पाणी, घेण्याची योग्य पद्धत माहितीय का?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुमचं आरोग्य यामुळे उत्तम राहू शकतं.
मुंबई : प्रत्येक घरामध्ये जिरे असतातच. हा असा मसाला भारतातील प्रत्येक घरामध्ये मिळतो. स्वयंपाक करताना विविध पदार्थ बनवताना त्यामध्ये चवीसाठी जिरे टाकतात. पण तुम्हाला माहीत आहे का, दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुमचं आरोग्य यामुळे उत्तम राहू शकतं.
जिरे खाण्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयर्न, कॉपर, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्ससारखे घटक जिऱ्यांमध्ये आढळतात, जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. इतकंच नाही तर वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरे खाण्याचे फायदे.
advertisement
त्वचा निरोगी राहते
जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे एक अँटिमायक्रोबायल असून, ते शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतं.
पचनक्रिया चांगली राहते
सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये अशी संयुगं असतात जी डायजेस्टिव एन्झाइम्सच्या उत्पादनास गती देतात.
advertisement
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिऊ शकता. जिऱ्यामध्ये असलेले पोषक घटक चरबी जलद बर्न करण्यास मदत करतात.
प्रतिकारशक्ती वाढते
रोज सकाळी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. चांगली प्रतिकारशक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यास मदत करते.
advertisement
ब्लड शुगर नियंत्रण
सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याच्या पाणी प्यायल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जिऱ्यांमध्ये असलेले हाय फायबर घटक आणि पोषक घटक नैसर्गिकरित्या इन्शुलिन पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
दरम्यान, बहुतांश भारतीय पदार्थ्यांमध्ये जिरे वापरले जातात. आजकाल अनेकांना अपचन, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण स्वयंपाक घरातील जिऱ्यांचं सेवन या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास उपयुक्त ठरतात.
advertisement
रिकाम्यापोटी जिरे खाल्ल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. पण जिरे खाण्याचं प्रमाणही योग्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं, यासाठी नियमित जिऱ्यांचं सेवन करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2023 12:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
त्वचेपासून ते पोटापर्यंत रामबाण उपाय जिऱ्याचे पाणी, घेण्याची योग्य पद्धत माहितीय का?


