TRENDING:

Dahi vs Yogurt : दही आणि योगर्टला एकच समजण्याची चुक तुम्ही ही करताय का? 99 टक्के लोकांना हा गैरसमज

Last Updated:

दुकानातून दही घेताना तुम्ही नक्कीच दही सोबत आणखी एक शब्द ऐकला असणार. तो म्हणजे ‘योगर्ट’. आता अनेकांना वाटतं की दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याची दोन नावं आहेत, पण असं नाही. खरंतर दही आणि योगर्ट यात फरक असतो

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दही हा भारतात एक अत्यंत लोकप्रिय अन्नपदार्थ आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या काळात बहुतांश लोक दहीभात खातात. कारण यामुळे पोटाला थंडावा मिळतो आणि अन्न लगेच पचतं देखील. तर अनेक घरात दररोजच्या जेवणात दही लागतो आणि अनेक लोक तो आपल्या घरीच लावतात. घरी लावलेला दही हा बाजारातील दहीपेक्षा चवीला चांगला लागतो.
दही आणि योगर्ट
दही आणि योगर्ट
advertisement

पण दुकानातून दही घेताना तुम्ही नक्कीच दही सोबत आणखी एक शब्द ऐकला असणार. तो म्हणजे ‘योगर्ट’. आता अनेकांना वाटतं की दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याची दोन नावं आहेत, पण असं नाही. खरंतर दही आणि योगर्ट यात फरक असतो.

दही आणि योगर्टमध्ये फरक

बहुतेक लोकांचा असा समज असतो की दही आणि योगर्ट एकच आहे, पण त्यांची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. दही पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी बनवला जातो, तर योगर्ट व्यावसायिक पद्धतीने खास बॅक्टेरियल कल्चर जसे Streptococcus thermophilus आणि Lactobacillus bulgaricus वापरून तयार केला जातो. योगर्ट दह्यापेक्षा अधिक स्मूथ आणि क्रीमी मानला जातो.

advertisement

तुम्हाला माहितीय का की काही लोक असं देखील क्लेम करतात की फक्त 15 मिनिटात दही लावलं जाऊ शकतं. ते कसं? चला जाणून घेऊ

1. पहिली स्टेप – दूध गरम करा

दही लवकर आणि घट्ट जमण्यासाठी दूध गरम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते मंद आचेवर गरम करा. दूध जितके घट्ट, तितके दहीही घट्ट होईल.

advertisement

2. दुसरी स्टेप– भांड तयार करा

दूध गरम होत असताना, मातीच्या भांड्याला आधी थोडं दही लावून ग्रीस करा. काही लोक दूध घालून नंतर चम्मचाच्या मदतीने त्यात थोडं तयार दही घालतात.

3. दूधाचे तापमान तपासा

दही घट्ट जमण्यासाठी दूधाचे योग्य तापमान महत्वाचे आहे. दूध थोडे थंड झाल्यावर तपासा, ते इतके गरम असावे की बोट सहन करू शकेल.

advertisement

4. भांड्यात दूध टाका आणि झाकण लावा

ग्रीस केलेल्या मातीच्या भांड्यात दूध ओता आणि वर फॉइल पेपर लावा.

5. कुकरमध्ये 15 मिनिटे

दही 15 मिनिटांत घट्ट होण्यासाठी कुकरचा वापर करा. कुकरमध्ये थोडे पाणी घालून गरम करा, मातीचं भांडं ठेवा आणि झाकण लावा, पण कुकरची शिटी काढा. 15 मिनिटे मंद आचेवर ठेवा. नंतर दही घट्ट झालेला असेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dahi vs Yogurt : दही आणि योगर्टला एकच समजण्याची चुक तुम्ही ही करताय का? 99 टक्के लोकांना हा गैरसमज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल