TRENDING:

Dating App वर मुली नेमकं काय पाहतात? मुलांच्या फोटोत नक्की काय बघून करतात Left किंवा Right Swipe

Last Updated:

या प्रश्नाचे उत्तर केवळ नशिबाच नाही, तर ते एका संपूर्ण मानसिक प्रक्रियेत (Psychological Process) दडलेले आहे. मुलींचे 'हो' किंवा 'नाही' हे काही सेकंदांत ठरते. या निर्णयामागे कोणतं विज्ञान काम करतं, चला समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल डेटिंग ॲप्स (Dating Apps) ही नवीन पिढीसाठी डेटिंगसाठी किंवा फ्रेंडशीपसाठी सर्वात मोठी जागा बनली आहेत. पण यात सर्वात जास्त गोंधळ उरतो तो पुरुषांचा, त्यांना अनेकदा असं वाटतं की आपण उत्तम फोटो ठेवला, चांगली हाईट आणि 'कूल' स्टाईल आहे, हे सगळं असूनही आपल्याला 'मॅच' का येत नाही, या विचारात असतात. त्यांना वाटते की प्रोफाइल अगदी परफेक्ट आहे, तरीही मुलींचा 'राईट स्वाइप' (Right Swipe - होकार) का मिळत नाही?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

या प्रश्नाचे उत्तर केवळ नशिबाच नाही, तर ते एका संपूर्ण मानसिक प्रक्रियेत (Psychological Process) दडलेले आहे. मुलींचे 'हो' किंवा 'नाही' हे काही सेकंदांत ठरते. या निर्णयामागे कोणतं विज्ञान काम करतं, चला समजून घेऊया.

1. प्रोफाइल फोटो: पहिला प्रभाव (The First Impression)

'फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन' ही म्हण डेटिंग ॲपवर अक्षरशः खरी ठरते. मुली सर्वात आधी तुमच्या फोटोवर नजर टाकतात आणि इथेच तुमचा अर्धा गेम सेट होतो.

advertisement

चेहरा महत्त्वाचा: चेहरा स्पष्ट दिसेल आणि तुम्ही हसमुख असाल, अशीच पहिली प्रतिमा ठेवा. हसऱ्या चेहऱ्यातून विश्वास आणि सकारात्मकता (Positivity) दिसून येते.

गॉगल्स लावणे, जिममध्ये आरशात काढलेले सेल्फी (मिरर सेल्फी), किंवा अंधारात काढलेले अस्पष्ट फोटो टाळा. लक्षात ठेवा, मुलींना तुमचे Biceps नाही, तर तुमच्या स्वभावातून निर्माण होणारी सुरक्षितता हवी असते.

2. बायो (Bio): 'बोअरिंग' माणसांना नो-एन्ट्री

advertisement

जर फोटो आकर्षक असेल आणि मुलीने त्यावर वेळ दिला, तर तिची नजर तुमच्या बायोवर (Profile Description) जाते. रिकाम्या बायोचा अर्थ मुलींसाठी 'हा माणूस बोअरिंग आहे' असा होतो. तुमच्या बायोमध्ये तुम्ही प्रामाणिक असावे आणि त्यात थोडा विनोद (Humour) नक्कीच असायला हवा. हे तुमची पर्सनॅलिटी दर्शवते.

तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा (कुकिंग, गिटार, ट्रॅव्हलिंग) आवर्जून उल्लेख करा. यामुळे मॅच झाल्यावर संभाषणाची सुरुवात करणे सोपे होते. "नो ड्रामा" किंवा "टाइम वेस्ट नको" यांसारखी नकारात्मक वाक्ये वापरणे टाळा. यामुळे तुमचा स्वभाव रागीट किंवा तक्रार करणारा आहे, असे वाटू शकते.

advertisement

3. ग्रुप फोटोचा गोंधळ आणि 'सोलो' चित्र (The Group Confusion)

पहिली चूक म्हणजे पहिल्याच स्लॉटमध्ये मित्रांसोबतचा ग्रुप फोटो लावणे. पहिल्या फोटोत तुम्ही इतरांसारखे दिसलात, तर मुलीला तुमच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही आणि ती प्रोफाइल लगेच डावीकडे (Left Swipe) करते.

पहिली प्रतिमा नेहमी सोलो (Solo) असावी. तुम्ही सामाजिक आहात हे दाखवण्यासाठी मित्रांसोबतचे फोटो तुम्ही नंतरच्या स्लॉटमध्ये लावू शकता.

advertisement

4. 'कूल' नाही, 'रिअल' बना (Be Authentic, Not Just Cool)

मुली नकली (Fake) प्रोफाइल त्वरित ओळखतात. खूप जास्त फिल्टर, ओव्हर-एडिट केलेले फोटो किंवा कुठेही कॉपी-पेस्ट केलेली शायरी आता काही कामाची नाही. तुम्ही जसे आहात, तसे खरे आणि नैसर्गिक (Natural) दिसा.

तुम्ही 'डॉग लव्हर' असाल, तर तुमच्या पाळीव प्राण्यासोबतचा फोटो टाका. जर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल, तर त्या प्रकारचा फोटो ठेवा. असलियत नेहमीच दिखाव्यापेक्षा जास्त आकर्षक असते.

5. 'विश्वासाची भिंत' : 'हाँ' चा अंतिम निर्णय

डेटिंग ॲपवर मुलींचा 'राईट स्वाइप' करण्याचा अंतिम निर्णय हा विश्वासावर (Trust) अवलंबून असतो. मुलीला जेव्हा ही खात्री वाटते की समोरचा माणूस इंटरेस्टिंग तर आहेच, पण तो सुरक्षित (Safe) आणि चांगला माणूस देखील आहे, तेव्हाच ती 'हो' (Yes) करते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

त्यामुळे, पुढच्या वेळी प्रोफाइल बनवताना, स्वतःला 'हिरो' किंवा 'जास्त कूल' दाखवण्याऐवजी, एक चांगला, साधा आणि प्रामाणिक व्यक्ती म्हणून सादर करा. हा प्रामाणिकपणा तुमचे 'राईट स्वाइप' नक्कीच वाढवेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dating App वर मुली नेमकं काय पाहतात? मुलांच्या फोटोत नक्की काय बघून करतात Left किंवा Right Swipe
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल