TRENDING:

Akshy Khanna : "रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है" धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या या डायलॉगचा नेमका अर्थ काय?

Last Updated:

akshy khanna dialogue : या प्रसिद्ध डायलॉगचा नेमका अर्थ काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, शिवाय तो इतका प्रभावी का वाटतो? असं देखील लोक विचार करु लागले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : चित्रपटांमध्ये काही डायलॉग असे असतात, जे फक्त कानावर पडले… तरी अंगावर काटा आणतात. आपण कितीही वेळा पाहिला तरी त्या डायलॉगची धार कमी होत नाही. ‘धुरंधर’ सिनेमातला अक्षय खन्नाचा एक असाच डायलॉग सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. तो म्हणजे "रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है"
अक्षय खन्ना प्रसिद्ध डायलॉग
अक्षय खन्ना प्रसिद्ध डायलॉग
advertisement

हा डायलॉग ऐकला की लोक थोडं थबकतात. आवाजाची टोन, चेहऱ्यावरचा राग आणि शब्दांची जुळवाजुळव सगळं मिळून या डायलॉगला एक वेगळाच पंच मिळतो. ते ऐकताना असं वाटतं की अक्षय खन्ना शिवाय हा डायलॉग आणि पंच कोणालाही इतका चांगला जमणारच नाही. म्हणूनच तर या सिनेमातील अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरला एवढं पसंत केलं जातंय.

advertisement

पण या प्रसिद्ध डायलॉगचा नेमका अर्थ काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, शिवाय तो इतका प्रभावी का वाटतो? असं देखील लोक विचार करु लागले आहेत.

‘धुरंधर’ हा चित्रपट गुन्हेगारी जगताचं एक वेगळं रूप दाखवतो. त्यातील एक दमदार कॅरेक्टर म्हणजे रहमान डकैत. हे निगेटिव्ह पात्र आहे. तो साधा गुन्हेगार नाही. तो असा डकैत आहे, ज्याचं नाव ऐकलं तरी लोक घाबरतात. त्याने दिलेली शिक्षा अचानक नसते… ती संदेश देणारी असते, असं व्यक्तीमत्व सिनेमात तयार केलं गेलं.

advertisement

'कसायीनुमा' म्हणजे काय?

'कसायीनुमा' हा शब्द हिंदी-उर्दूतून आला आहे. याचा साधा अर्थ कसाईसारखी, म्हणजे असा मृत्यू जो निर्दयी, हळूहळू त्रास देणारा, भीती निर्माण करणारा आणि पाहणाऱ्याच्या हृदयात धडकी भरवणारा.

कसाई जेव्हा प्राण काढतो किंवा प्राण्याला मारतो तेव्हा तो सहज, शांत, पण अत्यंत निर्दयीपणे हे काम करतो. त्या क्रूरतेची उपमा इथे दिली आहे.

advertisement

डायलॉगचा खरा अर्थ काय?

हा डायलॉग सांगतो की, रहमान डकैत जर एखाद्याचा जीव घेतो… तर ती साधी हत्या नसते. ती एक क्रूर, थरकाप उडवणारी, भीती निर्माण करणारी कसाईसारखी दिलेली शिक्षा असते. एखाद्याचा जीव घेणं त्याच्यासाठी गुन्हा नाही… तर “उदाहरण” असतं. एकदा त्याने दिलेली शिक्षा पाहिली की जगाला संदेश जातो की, 'ही व्यक्ती फक्त मारत नाही… भय निर्माण करते.'

advertisement

हा संवाद प्रेक्षकांना एवढा भिडतो का?

कारण हा संवाद फक्त शब्दांचा नाही… तो इमेजरी तयार करतो.

मौत म्हणजे अंतिम सत्य,

दी हुई म्हणजे जानबूजकर, प्लॅन करून

कसायीनुमा क्रूर, थंड, निर्दयी या तीन शब्दांच्या कॉम्बिनेशनमुळे डोक्यात एक चित्र तयार होतं की जिथे मरण फक्त परिणाम नसून… एक प्रक्रिया आहे. यामुळे या डायलॉगला किक किंवा एक पंच मिळते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

अक्षय खन्ना शांत, कंट्रोल्ड, पण धारदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्या डायलॉगमध्ये त्याने आवाज खाली ठेवला, चेहऱ्यावर भावना कमी… पण डोळ्यांत धमकी टाकली. हा डायलॉग जर कोणीतरी ओरडून म्हणाला असता तर प्रभाव तितकासा झाला नसता. पण अक्षयने तो हळू, ठाम आणि दमदार टोनमध्ये म्हटला जणू तो फक्त सांगत नाही… तर जाणीव करून देतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Akshy Khanna : "रहमान डकैत की दी हुई मौत बड़ी कसाई नुमा होती है" धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या या डायलॉगचा नेमका अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल