चांगल्या डोळ्यांसाठी कोणता आहार घ्यावा ?
- व्हिटॅमिन ए मध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती, हृदय आणि फुफ्फुस मजबूत करण्याची ताकद आहे. कोरड्या डोळ्यांच्या समस्येवरही व्हिटॅमिन ए उपयुक्त आहे. तसंच सॅल्मन, ब्रोकोली, तृणधान्यं, अंडी आणि गाजर यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
- व्हिटॅमिन सी मोतीबिंदूचा धोका देखील कमी करू शकतो, यामुळे तुमच्या डोळ्यांच्या
advertisement
लेन्स खराब होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही ब्रोकोली, संत्री, लिंबू आणि स्ट्रॉबेरी खाऊ शकता.
Hair care tips : केस दाट आणि मजबूत करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा, केस दिसतील चमकदार
- ओमेगा-३ समृद्ध पदार्थ जसं की ट्यूना, सॅल्मन, मॅकरेल, हेरिंग, चिया सीड्स, जवस आणि अक्रोड खा. हे देखील तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
- व्हिटॅमिन ई रेटिना म्हणजेच डोळ्यांच्या पडद्यासाठी उपयुक्त आहे. डोळ्यांचे आजार रोखण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, हिरव्या भाज्या, लाल सिमला मिरची आणि एवोकॅडोचा समावेश करु शकता.
पेपर असो की नोकरीसाठी मुलाखत, महत्त्वाच्या प्रसंगी हृदयाची धडधड का वाढते?
झिंक म्हणजेच जस्त, व्हिटॅमिन ए मेलॅनिन तयार करण्यास मदत करते. यासाठी तुम्ही मांस, चणे, मसुर डाळीचा समावेश करू शकता. भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, अंडी, चीज आणि दूध यांचंही सेवन करा.
- आपल्या डोळ्यांसाठी ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन महत्त्वाचे आहेत. यासाठी पालक, वाटाणे, ब्रोकोली, संत्र्याचा रस, लाल मिरची, खरबूज आणि द्राक्षं यांचा समावेश करा.
आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, काहींना लॅपटॉपवर सतत काम करावं लागतं, काही वेळा कामाचा ताण इतका असतो की डोकं वर काढायची पण फुरसत नसते. अशावेळी काही व्यायाम करायला विसरु नका. अन्यथा डोळ्यांवर ताण येऊ शकतो. कामातून विश्रांती घ्या, डोळ्यांची उघडझाप करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, एक व्यायाम नेहमी सांगितला जातो, तो म्हणजे, तुमचा अंगठा समोर धरा आणि त्यावर काही सेकंद लक्ष केंद्रित करा. हा व्यायाम पाच - सहा वेळा केल्यानं डोळ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो.