Hair care tips : केस दाट आणि मजबूत करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा, केस दिसतील चमकदार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस चांगले दिसण्यासाठी सतत केमिकलचा वापर केला जातो, पण असं न करता नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर केसांचं सौंदर्य अधिक खुलून येतं.
मुंबई : केस चांगले दिसण्यासाठी सतत केमिकल आणि हीटिंग टूल्सचा वापर केला जातो पण यामुळे केस खराब होतात. केस रेशमी दिसण्यासाठी अनेक जण बाजारातून विविध प्रकारची रासायनिक उत्पादनं खरेदी करतात, परंतु त्यांच्या वापरामुळे केसांचं आणखी नुकसान होतं. यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा तर जातोच शिवाय कोंडा, केस गळणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.
जाणून घेऊयात, केस मजबूत आणि रेशमी बनवण्यासाठीच्या काही खास टिप्स -
केस रेशमी दिसण्यासाठी काय करावं ?
सीरम आणि स्प्रे केसांना फक्त काही काळ रेशमी आणि चमकदार ठेवतात. परंतु जर तुम्हाला तुमचे केस नेहमीच चमकदार दिसायला हवे असतील तर केसांना तेल लावा. केसांना तेल लावून मसाज केल्यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केसांच्या पेशींना चालना, ऊर्जा मिळते. यामुळे केस मजबूत होतात आणि केस लवकर वाढतात.
advertisement
कडुनिंबाचे फायदे -
अनेक वेळा केस खूप कोरडे आणि निर्जीव दिसतात. यासाठी कडुनिंबाची पानं खूप फायदेशीर ठरतात.
कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे केस मजबूत चमकदार होतात. पाण्यात मूठभर कडुनिंब टाकून चांगलं उकळवा. उकळल्यानंतर पानं काढून त्यात थोडासा कोरफडीचा गर टाकून मिक्स करा. या
advertisement
मिश्रणानं केस धुतले तर केस निर्जीव दिसत नाहीत आणि केस मऊ, मुलायम होतात.
आवळा पावडर
आवळा पावडर त्वचेसाठी तसंच केसांसाठी खूप चांगली मानली जाते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट पॉलीफेनॉल आणि टॅनिन आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. दह्यात एक चमचा आवळा पावडर मिसळा, त्यात एक चमचा मधही टाका. आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर नीट लावा. 25 मिनिटं वाळवा. यानंतर केस पाण्यानं धुवा. यामुळे तुमचे केस गळणं देखील कमी होतं आणि तुमचे केस रेशमी आणि चमकदार बनतात.
advertisement
अंडी आणि बदाम तेलाचे फायदे
केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अंडी हा एक चांगला पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि ई असतं, तसंच
बायोटिन आणि फोलेटने भरपूर असल्यानं केस चमकदार बनवण्यास मदत होते. हे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग टाका, ते चांगलं मिसळा आणि त्यात थोडे बदाम तेल घाला. आता हे मिश्रण केसांना नीट लावा आणि तीस मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर केस धुवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2024 12:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair care tips : केस दाट आणि मजबूत करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा, केस दिसतील चमकदार


