Sleep routine tips : रात्री उशिरा झोपल्यानं होऊ शकतं नुकसान, चांगल्या झोपेसाठी करा हे उपाय

Last Updated:

आपल्या देशात झोपेबद्दल अनेक गैरसमज आहेत. खरं तर झोप ही अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांइतकीच महत्त्वाची आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतात.

News18
News18
मुंबई : आपल्या देशात झोपेबद्दल अनेक गैरसमज आहेत. खरं तर झोप ही अन्न, वस्र, निवारा या मूलभूत गरजांइतकीच महत्त्वाची आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात इतकी व्यस्त आहे की अनेकदा झोप पूर्ण होत नाही. उशिरा घरी येण्यामुळे आणि सकाळी लवकर घर सोडल्यामुळे, एखादी व्यक्ती झोपेबद्दल तडजोड करते, ज्याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. रात्री उशीरा झोपणं हा तुमच्या दिनक्रमाचा भाग झाला असेल तर तुम्ही अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात हे नक्की. जाणून घेऊया उशीरा झोपण्याचे किंवा कमी झोपेचे काय तोटे आहेत आणि ते कसे टाळता येऊ शकतात.
उशिरा झोपण्याचे तोटे-
उशिरा झोपल्यानं व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक तणावामुळे कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घेण्याच्या त्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. पुरेशी झोप न घेतल्यानं हृदयविकाराचा झटका येणं, मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. हे आजार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. पुरेशी झोप न मिळाल्यानं, अनेकदा चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. मुळात, झोप ही आपल्या शरीराची जैविक गरज आहे हे लक्षात ठेवा.
advertisement
जर तुम्ही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवत असाल तर तुमच्यासाठी झोप घेणं खूप महत्वाचं आहे कारण असं केलं नाही तर तुमची एकाग्रता कमी होते. त्यामुळे तुमच्या शिकवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
झोप सुधारण्यासाठी हे नक्की करा -
चांगल्या झोपेसाठी, रात्री झोपण्याची वेळ निश्चित करा. साधारण 7-8 तासाची झोप आवश्यक आहे. रात्री झोपायला जात असाल तेव्हा किमान एक तास आधी मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणं बंद करा. कारण, यामुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो. रात्री झोपण्यासाठी पलंग स्वच्छ, टापटीप असावा. आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवा. याशिवाय तुम्ही चांगल्याझोपेसाठी ध्यान आणि योगासनंही करू शकता. रात्री हलकं अन्न घ्या. खाल्ल्यानंतर थोडासा फेरफटका मारावा.
advertisement
एकाग्रता, स्मरणशक्तीसाठी चांगली आणि गाढ झोप आवश्यक आहे, अपुऱ्या झोपेचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होतो. मुळात दिवसभराच्या दगदगीनंतर, मेंदूला विश्रांतीची गरज असते, त्यामुळे याबद्दल बाऊ करण्यापेक्षा झोपेच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं अधिक सरस ठरेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sleep routine tips : रात्री उशिरा झोपल्यानं होऊ शकतं नुकसान, चांगल्या झोपेसाठी करा हे उपाय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement