आता विशीतच होतोय ब्रेस्ट कॅन्सर! भारतातील परिस्थिती तर आणखीनच बिकट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
२०१२ ते २०२१ या काळात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वार्षिक १.४ टक्क्यांनी वाढले आहे.
मुंंबई: ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे. ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने जगभरातील या आजाराची सद्यस्थिती काय आहे, हे जाणून घेऊया. ‘एबीपी लाईव्ह’कडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
एप्रिल २०२३ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह इतर कॅन्सरविषयक संस्थांच्या माहितीनुसार ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांना सर्वाधिक होणारा कॅन्सरचा प्रकार आहे. कॅन्सरने दगावणाऱ्या महिलांमध्येही या कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे. जागतिक स्तरावर सुमारे १२ टक्के महिलांना हा आजार होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये जगभरातील ६,७०,००० मृत्यू हे ब्रेस्ट कॅन्सरमुळे झाले. या आजाराचे रुग्ण ९९% पेक्षा जास्त महिला असतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने केलेल्या एका संशोधनानुसार २०१२ ते २०२१ या काळात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण वार्षिक १.४ टक्क्यांनी वाढले आहे.
advertisement
अमेरिकेत वयाच्या अवघ्या विशीतली तरुणींमध्येही हा आजार आता दिसत आहे. JAMA नेटवर्क ओपनमधील संशोधनानुसार अमेरिकेत २० ते ४९ वर्ष वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. २००० ते २०१९ या काळातील २,१७,००० रुग्ण महिलांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. २००० मध्ये हे प्रमाण एक लाख महिलांमागे ६४ रुग्ण एवढे होते. २०१६ पर्यंत ते एक लाख महिलांमागे ६६ एवढे झाले. पुढे २०१९ पर्यंत तेच प्रमाण एक लाख महिलांमागे ७४ एवढे वाढल्याचे दिसून आले.
advertisement
सेंट लुईसमध्ये वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी केलेल्या एका संशोधनानुसार गेल्या दोन दशकांमध्ये पन्नाशीच्या आतील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढला आहे. गौरेतर महिलांमध्ये तो धोका जास्त असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. इतरांच्या तुलनेत २० ते २९ वर्ष वयाच्या गौरेतर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ५३% जास्त आहे. भारतात २०१८ मध्ये १,६२,४६८ महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. त्यांपैकी ८७,०९० महिलांचा मृत्यू झाला. भारतात ग्रामीण भागातही या आजाराचे प्रमाण वाढत आहे. तरुण मुलींमध्येही आता ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होत आहे. लवकर निदान झाले तर हा आजार बरा होतो मात्र निदान होण्यास वेळ लागला तर त्यामुळे जीवाला धोका असतो. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, प्रदूषण, बिघडलेली लाइफस्टाइल अशी अनेक कारणे त्यामागे असू शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2024 5:53 PM IST


