TRENDING:

WFH Health Risks : वर्क फ्रॉम होम करता? सारखा थकवा आणि ब्लॉटिंग होतं? डॉक्टरांनी दिला 'या' गंभीर आजाराचा इशारा

Last Updated:

Work from home side effects : घरून काम करण्याचे काही फायदे तसे तोटेही असतातच. घरी बसून काम करणाऱ्या लोकांना फॅटी लिव्हर डिसीज होण्याचा धोका जास्त असल्याचं कळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हल्ली जग खूप बदलतंय. तशा आपल्या सवयी, आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि कामामध्येही खूप बदल होत आहे. पूर्वी सर्वांना घराबाहेर जाऊन काम करायला लागायचं. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना शरीराची हालचाल व्हायची. पण आता बहुतांश लोक घरी बसून काम करतात. त्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी झाली आहे.
दीर्घकाळ बसून राहण्याचे दुष्परिणाम
दीर्घकाळ बसून राहण्याचे दुष्परिणाम
advertisement

आता घरून काम करण्याचे काही फायदे तसे तोटेही असतातच. घरी बसून काम करणाऱ्या लोकांना फॅटी लिव्हर डिसीज होण्याचा धोका जास्त असल्याचं आता कळत आहे. जी लोकं अल्कोहोल पीत नाही त्यांनाही फॅटी लिव्हर डिसीज होण्याचे हे मोठे कारण आहे. विशी, तिशी आणि चाळीशीतल्या लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होतो. याच सर्वात मोठं कारण सांगितलं जातं, ते म्हणजे डेस्कवर किंवा घरी दीर्घकाळ बसून काम करणं. डॉक्टर कार्तिक साहनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दल सविस्तर माहिती दिलीय.

advertisement

डॉक्टरांनी दिलं एका केसचं उदाहरण..

त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडे उपचारासाठी एक मुलगा आला होता. तो वर्क फ्रॉम होम करायचा, अजिबात अल्कोहोल घेत नव्हता. तरीही त्याचा लिव्हर डॅमेज झालं होतं. मुलाचं वय फार जास्त नव्हतं, पण आयटी सेक्टरमध्ये असल्यामुळं 8 ते 10 तास बसून काम करायचा. शारीरिक हालचाल नव्हती, दिवसभर काहीतरी स्नॅक्स खात असायचा आणि रात्री उशिरा जेवायचा.

advertisement

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं लिव्हर डॅमेज झालं तरी याच्या शरीरात फारशी तीव्र लक्षणं दिसत नव्हती. फक्त थकवा, ब्लॉटिंग आणि वजन वाढणं एवढाच त्रास त्याला झाला. या लक्षणांकडे मुलाने दुर्लक्ष केलं. जेव्हा रुटीन टेस्ट केल्या गेल्या तेव्हा अल्ट्रासाऊंडमध्ये फॅटी लिव्हर ग्रेड 3 असल्याचं कळलं. त्यानंतर जेव्हा फायब्रोस्कॅनने पुढच्या टेस्ट केल्यानंतर अर्ली क्रोनिक लिव्हर डिसीज असल्याचं लक्षात आलं. मुलाच्या लिव्हरमध्ये फायब्रोसिस झाले होते.

advertisement

डॉक्टरांच्यामते, फॅटी लिव्हर डिसीज केवळ अलकोहोलमुळे होत नाही. हल्लीच स्थिर म्हणजेच हालचाल नसलेलं लाइफस्टाइल याचं सर्वात मोठं कारण आहे. जास्त वेळ एका जागी बसणं, शारीरिक हालचाल न करणं, अनहेल्दी स्नॅक्स खाणं, रात्री उशिरा जेवण करणं.. या सर्वांमुळे मेटॅबॉलिझम बघडतं आणि ते हळूहळू फॅटी लिव्हर डिसीजचं कारण बनू शकतं.

फॅटी लिव्हर डिसीज टाळण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी..

जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल करा. जास्त वेळ एका जागी बसून राहू नका. मध्येच थोडा वेळ चाला आणि नियमितपणे स्ट्रेचिंग करा. शक्य असल्यास मीटिंगमध्ये उभं राहा. लीन प्रोटीन, संपूर्ण धान्य आणि भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. थोडासाही त्रास किंवा सतत अस्वस्थता जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अजबच! महाराष्ट्रात इथं आहे ‘नवरा-नवरी’चं मंदिर, नवसासाठी होते गर्दी, पण 'ते' गूढ आजही कायम, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
WFH Health Risks : वर्क फ्रॉम होम करता? सारखा थकवा आणि ब्लॉटिंग होतं? डॉक्टरांनी दिला 'या' गंभीर आजाराचा इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल