आवळा शॉट्स साठी लागणारे साहित्य
100 ग्राम आवळा, मिरे पूड, जिरे पूड,मध, अद्रक आणि पुदिन्याचे पाने, आणि थोडंसं पाणी एवढे साहित्य यासाठी आपल्याला लागणार आहे.
आवळा शॉट्सची कृती
सगळ्यात पहिले तर आवळा बारीक फोडी करून घ्यायचा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आवळा टाकायचा त्यानंतर त्यामध्ये छोटा अर्धा चमचा मिरे पूड टाकायची छोटा अर्धा चमचा जिरेपूड टाकायचे आठ ते दहा पुदिन्याचे पाने एक ते दीड चमचा मध हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. बारीक झाल्यानंतर तुम्ही गाळणीने किंवा एका सुती कपड्यांमध्ये हे सर्व टाकून त्यातला सर्व जो रस आहे तो काढून घ्यायचा.
advertisement
लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं पाणी टाकून हा रस काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे आवळा शॉट्स शॉट्स बनून तयार होतात. अगदी पाच मिनिटांमध्ये हे सर्व बनवून तयार होतं तर घरी देखील ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा.