TRENDING:

पुणेकर मंदाआजी, वयाच्या 65 वर्षी चालवताय मटकी भेळचा गाडा, चव अशी की परत याल! Video

Last Updated:

पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी मंदा आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी 
advertisement

पुणे : अनेक पिढी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आपण पाहिले असतील. त्याचप्रमाणे पुण्यात राहणाऱ्या मंदा आजी यांच्या गेले तीन पिढ्या भेळीचा व्यवसाय करत आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोड येथे त्यांचा भेळीचा गाडा असून गेली 70 वर्ष झालं त्यांचा कुटंबीयांचा व्यवसाय सुरु आहे. या ठिकाणी मंदा आजीच्या हातची भेळ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते.

advertisement

आनंद मटकी भेळ नावाने गाडा असून मंदा आजीच वय हे 65 वर्ष आहे. त्यांच्या हातची ओली मटकी भेळ काही वेगळीच असून लोक आवर्जून ती खाण्यासाठी येत असतात. तर या सोबत ओली आणि सुकी अशी भेळ ही बनवतात. येणारे जाणारे देखील आजीकडे कौतुकाने बघत असतात.

Lockdown मध्ये नोकरी गेली, सुरू केला फूड स्टॉल, आज कमवतोय 100000 रुपये!

advertisement

पूर्वी माझे सासरे शेंगा भाजणे, सरबत बनवण्याच काम करत होते. त्यानंतर हळू हळू मग भेळ बनवायला सुरुवात केली. गेली 30 वर्ष झालं मी भेळ बनवत आहे. मटकी चिवडा भेळ ही आमची स्पेशालिटी असून लोकांना ती खूप आवडते. तर ही भेळ दगडी पोहे, चिवडा, मटकी, कांदा, चटणी, लिंबू टाकून ही बनवली जाते. सुरुवात केली तेव्हा भेळची 8 किंमत रुपये होती. आता ती भेळ 50 रुपयाला मिळत आहे.  यासोबतच मटकी भेळ, ओली भेळ, शेवपुरी, पाणीपुरी देखील तयार केली जाते. लोकांचा चांगला प्रतिसाद असतो. लांबून लोक ही भेळ खाण्यासाठी येतात. त्यामुळे छान वाटतं, अशा भावना मंदा कबाडे या आजीने व्यक्त केल्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

मंदा आजीचे वय 65 असून देखील त्या हे भेळीचा व्यवसाय अगदी आनंदाने करत असतात. तर त्यांना त्यांच्या कामात त्यांचे नातू देखील मदत करत असतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पुणेकर मंदाआजी, वयाच्या 65 वर्षी चालवताय मटकी भेळचा गाडा, चव अशी की परत याल! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल