TRENDING:

अरेबिक कुनाफा आता पुण्यात; एकाच ठिकाणी घ्या 10 प्रकारचा आस्वाद

Last Updated:

लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी हि डिश आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 7 ऑक्टोबर: भारतामध्ये अनेक प्रकारचे परदेशी पदार्थ प्रसिध्द आहेत. भारतातील लोक ते पदार्थ अगदी आवडीने खातात त्यातीलच एक म्हणजे अरेबिक कुनाफा. कुनाफा एक क्लासिक अरेबिक मिठाई आहे. तोंडाला पाणी आणणारी हि डिश असून तुम्ही दुधाच्या शेवया, शीरखुर्मा बरेचदा खाल्ला असेल पण कुनाफाची चव खूप छान लागते. शिवाय लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी हि डिश आहे. पुण्यामध्ये कुनाफा नेमका मिळेल कुठे याविषयीची माहिती जाणून घेऊया.
advertisement

कुठे मिळेल कुनाफा?

पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागात असणाऱ्या कुनाफा लॉन्ग या ठिकाणी तुम्हाला 10 वेगवेगळे कुनाफा मिळतात. गोड सरबत, कुरकुरीत काजू आणि नाजूक पेस्ट्री पीठ यांच्या परिपूर्ण मिश्रणासह बनवलेला हा कुनाफा हा पिंपरी चिंचवडकरांचा आवडीचा विषय ठरत आहे. यामध्ये लोटस कुनाफा, ओरिओ कुनाफा, बाऊंटी कुनाफा, कॅरेमल कुनाफा, चीज कुनाफा, न्यूटला कुनाफा, किटकॅट कुनाफा, पिस्टचो कुनाफा, न्यूट्टी कुनाफा, स्निकर कुनाफा या प्रकारचे कुनाफा मिळतात.

advertisement

बटाटे-कोबी नाही तर याठिकाणी होते बांबूची भाजी, चव अशी की मिळेल आनंद!

कसा बनवला जातो कुनाफा?

हा कुनाफा बनवण्यासाठी 2 कप शेवया दूध, साखर, कोर्नफ्लोर, काजू, बदाम, मनुके, पिस्ता, ऑरेंज फूड कलर, गुलाब जल, बटर, साजूक तूप हि सामग्री लागते. कुनाफा लॉन्ग मध्ये 10 पद्धतीचे कुनाफा मिळत असून पिंपरीचिंचवड मधील हे पाहिलं दुकान असून या ठिकाणी उत्कृष्ट चवीचे कुनाफा मिळतील. या कुनाफाची किंमत ही 200 रुपयांपासून 400 रुपये आहे. या ठिकाणी कॉलेजवयीन मुलं मुनाफ खाण्यासाठी आवर्जून येतात, असं कुनाफा लॉन्गचे मालक निशांत यांनी सांगितलं.

advertisement

70 पेक्षा जास्त वर्षांपासून कोल्हापुरात प्रसिद्ध आहे खांडोळी; पाहा कशी झाली सुरुवात

कुनाफा मूळचा कुठला?

पूर्वी सीरियाचा भाग असलेल्या आणि अरबी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या तुर्कीच्या प्रदेशात कच्च्या दुधापासून बनवलेला पदार्थ असून याला भारत आणि जगभरात फार मागणी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय .

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
अरेबिक कुनाफा आता पुण्यात; एकाच ठिकाणी घ्या 10 प्रकारचा आस्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल