आम्ही हे सर्व कोणत्या मिसळीबाबत म्हणत आहोत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. पुणे शहरात 'बेडेकर मिसळ' हे सर्वात जुनं दुकान आहे. मूळचे कोकणातले असलेल्या दत्तात्रय बेडेकर यांनी 1948 साली हे दुकान सुरू केले. सुरुवातीला फक्त चहापासून सुरू केलेल्या 'बेडेकर'मध्ये हळूहळू घरगुती नाश्त्याचे पदार्थसुद्धा मिळू लागले. त्यापैकीच एक मिसळ. पुढे ही मिसळच बेडेकरची ओळख झाली. या मिसळला पुणेकरांची प्रचंड पसंती मिळाली. गेली अनेक वर्षे ही बेडेकर मिसळ पुणेकरांच्या मनात घर करून बसली आहे.
advertisement
दम बिर्याणी खाल्ली असेल पण तसा चहा पिलाय? पुण्यातल्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग
बेडेकरांकडं एका खास पद्धतीने मिसळ तयार केली जाते. चिवड्यापासून कोरडं मिश्रण तयार केले जाते. ‘व्हाईट ब्रेड’ चे दोन काप आणि लिंबाच्या फोडीसोबत ही मिसळ सर्व्ह केली जाते. इथे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तर्री मिळतात. मसालेदार आणि तिखट चवीच्या विशिष्ट प्रमाणावरून हे प्रकार ठरतात. प्रत्येकाच्या पसंतीनुसार ग्राहक या तर्रीचा आस्वाद घेतात. ‘बेडेकर’ची तर्री ही कांदे, टोमॅटो, बटाटे आणि दुधीभोपळा अशा भाज्यांपासून बनवली जाते. तिचे वेगळेपण म्हणजे ती चवीला तिखटगोड असते.
मिसळीव्यतिरिक्त ‘स्पेशल चहा’, कांदा भजी यांसारखे अन्य पदार्थही येथे उपलब्ध आहेत. येथील गुलकंद, अळीव आणि शेंगदाणा हे तीन प्रकारचे लाडू फेमस आहेत. त्याचबरोबर चिरोटा आणि खरवस हे दुर्मीळ महाराष्ट्रीयन पदार्थही येथे मिळतात.
बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? पाहा सोपी रेसिपी
सकाळी 7 वाजता दुकान उघडल्यापासून दुकानाबाहेर मिसळप्रेमींची रांग लागते. आता या कुटुंबीयांची तिसरी पिढी या व्यवसायात लक्ष घालत आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण चवीमुळे त्यांनी पुणेकरांची आवडती मिसळ होण्याचा मान मिळवलाय.