दम बिर्याणी खाल्ली असेल पण तसा चहा पिलाय? पुण्यातल्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग

Last Updated:

तुम्ही आत्तापर्यंत दम बिर्याणी खाल्ली असेल. पण तसा चहा कधी पिलाय का?

+
News18

News18

पुणे, 15 सप्टेंबर :  आपल्या आजूबाजूला चहाचे अनेक शौकीन आपण पाहतो. त्यांना चहा शिवाय जमत नाही. पुणेकर तर चहाचे शौकीन आहेत. पुण्यात खाण्याच्या प्रकारइतकेच चहाचे प्रकार मिळतात. अमृततुल्य चहा, बासुंदी चहा, मसाला चहा तुम्ही नक्कीच पिला असेल. पण कधी शेतकरी स्पेशल तंदूर चहा घेतलाय का? नाही ना... पुण्यातल्या एका तरुण शेतकऱ्यानं याचा खास ब्रँड तयार केलाय. इतकंच नाही तर या चहाला दम देखील दिला जातो.
दम फक्त बिर्याणीला दिला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. पण, चहाला देखील दम दिला जातो हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल. काजू, बदामसारखे ड्राय फ्रुटस, चीज बटर टाकून तयार केलेला हा स्पेशल चहा निसर्गाच्या सानिध्यात बसून पिण्याची मजा काही औरच आहे.
advertisement
कुणी तयार केला ब्रँड?
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात असणाऱ्या चांबळी गावात राहणारा स्वप्नील परभाने या उच्च शिक्षित तरुणाने हा ब्रँड विकसित केलाय. स्वप्नीलनं पूर्ण अभ्यास करुन हा ब्रँड बनवलाय. या चहासाठी लागणारे मसाले तो घरीच बनवतो. चहा पावडर, साखर मोजून घेतली जाते. त्यानंतर काजू आणि बदामची पूड आणि घरगुती मसाला यात टाकला जातो. छोटे मडके अगोदर चुलीवर ताप ठेवले जातात. नंतर चहा तयार केला जातो. चहा तयार केल्यानंतर ते भाजलेल्या छोट्या मडक्यात चहाला तंदूर केले जाते. त्यानंतर त्या छोट्या मडक्यात कोळसा ठेवून ते मडके चहात ठेवले जाते. पाच सेकंद झाकण ठेवल्यानंतर त्या चहाला दम दिला जातो. त्यानंतर तो चहा ग्राहकांना पिण्यासाठी दिला जातो.
advertisement
शेतकरी स्पेशल तंदूर चहाची प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असून या युवा शेतकऱ्याचा हा ब्रँड भलताच फेमस होऊ लागला आहे. पुण्यातील अनेक चहा शौकीन या ठिकाणी चहा पिण्यासाठी येत असतात. नोकरीच्या मागे न लागता काही तरी व्यवसाय करून नागरिकांना काही तरी वेगळं देण्याच्या उद्देशाने स्वप्नीलनं हा ब्रँड विकसित केलाय. पुण्यापासून अवघ्या 25 ते 30 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
मराठी बातम्या/पुणे/
दम बिर्याणी खाल्ली असेल पण तसा चहा पिलाय? पुण्यातल्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement