संपदा बाहेती आणि आशिष बाहेती हे उच्चशिक्षित असून नाशिकमध्ये चांगल्या ठिकाणी नोकरीदेखील करत आहेत. मध्यंतरीच्या काळात संपदा आणि त्यांची लहान मुलगी एकाच वेळी आजारी पडले असताना त्यांना घरात काही करता येत नसे. आजारपणात कोणीही मदतीला नसल्याने संपदा यांनी एक वेळेस ऑनलाइन फ्रूट्स कुठे मिळतात का याची चौकशी केली. या अगोदर पुणे शहरात वास्तव्यास असताना सहज कटिंग फ्रूट्स उपलब्ध असायचे, मात्र नाशिकमध्ये कुठेही अशी पद्धत नाही हे त्यांना समजले.
advertisement
यानंतर आपण याचा व्यवसाय करू जेणेकरून आपल्या आजारात आपल्याला जी मदत मिळाली नाही किंवा जे काही सहन करावे लागले ते इतरांना त्रास नको याकरता त्यांनी त्यांच्या पतीसोबत घरातून या व्यवसायाची सुरुवात केली. आज ते आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्व हेल्दी फ्रुट्स कटिंग करून घरोघरी डिलिव्हरी करत असतात. इतकेच नाही तर गरजू महिलांना रोजगार मिळावा याकरता त्यांच्याकडून देखील हे फ्रुट्स कापून त्यांना योग्य पद्धतीने पॅकिंग करून विक्री करत असतात.
ताजे आणि हेल्दी फळ घरपोच मिळत असल्याने नाशिककरांना देखील यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच जिम करणाऱ्यांसाठी यांच्याकडे विशेष असे डाएट फ्रूट्स हे उपलब्ध करून देत असतात. तुम्हालादेखील नाशिकमधील यांची फ्रूट्स प्लेट घरी मागवायची असल्यास त्यांच्या इंस्टाग्राम पेज URVISFRUTPALLETE या ठिकाणाहून अधिक माहिती घेऊन ऑर्डर करता येणार आहे.





