TRENDING:

न्यूजपेपरवर खाद्यपदार्थ ठेवून खाताय? आजच करा बंद, तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Last Updated:

केवळ दुकानातूनच अन्नपदार्थ न्यूजपेपरवर दिले जातात असं नाही, तर आपण घरातही कधीकधी एका क्षणात न्यूजपेपरचं पान फाडून त्यावर पदार्थ ठेवून खाऊ लागतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सिंह, प्रतिनिधी
स्वयंपाकघरात एखादा पदार्थ तळल्यानंतर तो थंड होईपर्यंत आपण न्यूजपेपरवर ठेवतो.
स्वयंपाकघरात एखादा पदार्थ तळल्यानंतर तो थंड होईपर्यंत आपण न्यूजपेपरवर ठेवतो.
advertisement

विदिशा, 14 सप्टेंबर : भेळ आपल्या सर्वांनाच आवडते. समुद्रकिनाऱ्यावरील, प्रवासातील आपलं ते आवडतं खाद्यपदार्थ असतं. बऱ्याचदा आपण न्यूजपेपरमध्ये गुंडाळलेली भेळ खातो. तसंच कधीकधी वडापाव, पार्सल घेतलेली शेवपूरी, दहीपूरी, सँडविच, इत्यादींसारखे इतर अनेक पदार्थ आपण न्यूजपेपरवर खात असतो. या पदार्थांची चव अगदी जिभेवर रेंगाळणारी असते, मात्र याच चवीमागे आपल्या पोटात एक अत्यंत हानीकारक पदार्थ जात असतो, ज्याची आपल्याला माहितीही नसते.

advertisement

डॉक्टर श्रेयस पितलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूजपेपरवर अनेक अक्षरं छापलेली असतात. त्यावर गरम पदार्थ ठेवला की अक्षरांची शाई पदार्थाला लागते. या शाईमध्ये मानवी शरीरासाठी धोकादायक असे रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्या शरीरात गेल्यास आपल्याला गंभीर व्याधी जडू शकतात. यातून कर्करोगही होण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञ सांगतात. तर, लहान मुलांच्या शरीरात शाई गेल्यास त्यांचा बौद्धिक विकास खुंटतो, असं म्हटलं जातं.

advertisement

कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का?

खरंतर केवळ दुकानातूनच अन्नपदार्थ न्यूजपेपरवर दिले जातात असं नाही, तर आपण घरातही कधीकधी एका क्षणात न्यूजपेपरचं पान फाडून त्यावर पदार्थ ठेवून खाऊ लागतो. स्वयंपाक घरात एखादा पदार्थ तळल्यानंतर तो थंड होईपर्यंत आपण न्यूजपेपरवर ठेवतो. शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यासाठीही आपण न्यूजपेपरचा वापर करतो.

बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे? पाहा सोपी रेसिपी

advertisement

दरम्यान, अन्नपदार्थांसाठी न्यूजपेपरच्या जागी अक्षरं नसलेला पांढरा कागद किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर करावा, असा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही. परंतु गरम पदार्थ कागदात ठेवू नये, शक्यतो अन्नपदार्थ ठेवण्यासाठी एका स्वच्छ कापडाचा वापर करावा, असं तज्ज्ञ सांगतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
न्यूजपेपरवर खाद्यपदार्थ ठेवून खाताय? आजच करा बंद, तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल