पण तुमच्या या समस्येवर एक टेस्टी सोल्युशन आहे. इंस्टाग्रामवर एका इन्फ्लुएन्सरने पौष्टिक लाडवांची रेसिपी सांगितली आहे. हे लाडू तुमच्या शरीराला पोषण देतात आणि महिलांना येत असलेल्या जवळपास सर्वच समस्यांवर हे रामबाण उपाय आहेत. या लाडवांमध्ये असलेला प्रत्येक घटक वेगवेगळे फायदे देतो आणि शरीर मजबूत बनवतो.
या लाडवांमधील काळे तीळ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असतात आणि हे तीळ हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी उत्तम आहेत. जवस ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा एक समृद्ध स्रोत आहे, जे पीसीओएस (PCOS) मुळे होणारी सूज कमी करते. अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच टाळूच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि ते केस पातळ होऊ देत नाही.
advertisement
या लाडवांमध्ये असलेल्या भोपळ्याच्या बियामध्ये असलेले झिंक केसांची चमक टिकवून ठेवण्यास आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करते. तसेच साखरेऐवजी खजूर वापरल्याने हे लाडू लोहाने समृद्ध होतात, ज्यामुळे ॲनिमियासरकळ्या त्रासांवर आराम मिळतो. हे लाडू बनवणंही खूप सोपं आहे.
काळे लाडू बनवण्यासाठी साहित्य..
- तूप 1 मोठा चमचा
- काळे तीळ 1/2 कप
- जवस 1/4 कप
- अक्रोड 1/2 कप
- भोपळ्याच्या बिया 1/3 कप
- बिया काढलेले खजूर 10 ते 12
काळे लाडू बनवण्याची पद्धत..
- एका जाड बुडाच्या कढईत किंवा पॅनमध्ये मंद आचेवर तूप गरम करा. त्यात काळे तीळ, जवस, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया टाका.
- हे सर्व साहित्य मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे एकत्र छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
- हे मिश्रण खूप जास्त करपू देऊ नका किंवा त्याचा रंग खूप गडद होऊ देऊ नका.
- यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
- त्यात बिया काढलेले खजूर घाला आणि हे सर्व साहित्य एकत्र करून जाडसर वाटून घ्या.
- मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करताना ते प्लस मोडवर थांबत थांबत वाटा. नाहीतर त्याची पावडर बनेल.
- आता वाटलेल्या मिश्रणाचे लहान-लहान भाग घ्या आणि हाताने घट्ट दाबून लाडूंचा आकार द्या.
- लाडू डब्यात भरण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतील.
काही महत्त्वाच्या टीप्स..
तुम्हाला लाडवांचा मिश्रण कोरडं वाटतं असेल, लाडू वळले जात नसतील तर त्यात 1 ते 2 मऊ खजूर किंवा 1 छोटा चमचा गरम तूप घाला. हे लाडू एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. रूम टेम्परेचरवर ते 10 दिवसांपर्यंत टिकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
