Patvadi Recipe : जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
विशेषतः ग्रामीण भागात आणि सण-समारंभांत पाटवडीला खास स्थान आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि सोपी पद्धत यामुळे ही डिश प्रत्येक गृहिणीची आवडती मानली जाते.
मुंबई : महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत अनेक साधे पण चविष्ट पदार्थ आढळतात, त्यापैकी पाटवडी हा एक अत्यंत लोकप्रिय आणि घराघरांत आवडीने बनवला जाणारा पदार्थ आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि सण-समारंभांत पाटवडीला खास स्थान आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि सोपी पद्धत यामुळे ही डिश प्रत्येक गृहिणीची आवडती मानली जाते. चहासोबत किंवा जेवणात साइड डिश म्हणूनही ती उत्तम लागते.
advertisement
आजकाल झटपट आणि हेल्दी पदार्थांची मागणी वाढत असताना पाटवडी ही पारंपरिक रेसिपी आधुनिक स्वयंपाकघरातही तितकीच लोकप्रिय ठरत आहे. स्वादिष्ट पाटवडी कशी बनवायची चला तर मग जाणून घेऊया.
आवश्यक साहित्य:
बेसन – 2 कप
पाणी – 2 ते 2½ कप
हिरवी मिरची-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
कांदा – 1 बारीक चिरलेला
हळद – ½ टीस्पून
advertisement
मीठ – चवीनुसार
मोहरी – 1 टीस्पून
जिरे – 1 टीस्पून
कढीपत्ता – 8-10 पाने
तेल – 2 टेबलस्पून
कोथिंबीर – सजावटीसाठी
पाटवडी कृती
एका कढईमध्ये तेल टाकून कांदा, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, हळद हे सगळे भाजून घ्या. ते छान परतून झाले की त्यात पाणी टाका आणि पाणी उकळून झाले की त्यात बेसन पीठ घाला. पीठ असे घाला की त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजेत असे एकत्र करून घ्या.
advertisement
मिश्रण घट्ट होऊ लागलं की लगेच ताटात किंवा ट्रेला तेल लावून त्यात मिश्रण पसरवा. थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे कापा. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
खास टीप
पाटवडी अजून चविष्ट हवी असेल तर वरून थोडं तूप किंवा फोडणी घालू शकता.
ही डिश चहा किंवा जेवणासोबत खूप छान लागते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 3:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Patvadi Recipe : जेवणाला येईल रुचकरपणा, कमी वेळेत बनवा पारंपरिक पाटवडी, रेसिपीचा Video





