advertisement

'फ्रीज मर्डर'ने देश सुन्न! प्रेयसीला घरात संपवलं, शरीरासोबत केला क्रूरतेचा कळस; थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

Shocking Murder: विशाखापट्टणममध्ये नौदल कर्मचाऱ्याने प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

News18
News18
विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित नौदल कर्मचाऱ्याने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचे शरीर तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले असल्याचा आरोप आहे. आरोपीचे नाव चिंदडा रवींद्र तर मृत प्रेयसीचे नाव पोलिपल्ली मौनिका असे आहे.
विशाखापट्टणम मधील गाजुवाका परिसरातील सर्कल इन्स्पेक्टर (CI) यांच्या माहितीनुसार ही घटना एल.व्ही. नगरमधील एका घरात घडली. पोलिसांनी आरोपीच्या घरातून अर्धवट फ्रिजमध्ये ठेवलेले आणि उर्वरित गोणीत भरलेले मृतदेहाचे अवशेष जप्त केले.
रवींद्र (वय 35) हा INS Dega येथे कार्यरत होता. त्याची 29 वर्षीय मौनिकाशी 2021 मध्ये एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी रवींद्रची पत्नी विजयनगरम येथे माहेरी गेली होती. हीच संधी साधून रविवारी दुपारी रवींद्रने मौनिकाला घरी बोलावले.
advertisement
यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाच्या दरम्यान रवींद्रने मौनिकावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. काही तुकडे गोणीत भरून एका निर्जन ठिकाणी टाकले तर उर्वरित भाग घरातील फ्रिजमध्ये ठेवले.
यानंतर रवींद्र स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या म्हणण्यांनुसार मौनिकाने त्याच्याकडून 3.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांच्या संबंधाबद्दल पत्नीला सांगण्याची धमकी देत होती. याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होते आणि याच वादातून ही हत्या घडली.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता घरात आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले. मात्र मौनिकाचे डोके सापडले नाही. पोलिसांच्या अंदाजानुसार आरोपीने ते वेगळ्या ठिकाणी टाकले असावे. उर्वरित अवशेष शोधण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून खूनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाची तुलना श्रद्धा वॉकर हत्याकांडाशी केली जात आहे. 18 मे 2022 रोजी तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफ़ताब अमीन पूनावाला याने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले होते. त्याने ते फ्रिजमध्ये ठेवून अनेक दिवस वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते, ज्यामुळे हे प्रकरण अत्यंत भीषण ठरले होते.
view comments
मराठी बातम्या/देश/
'फ्रीज मर्डर'ने देश सुन्न! प्रेयसीला घरात संपवलं, शरीरासोबत केला क्रूरतेचा कळस; थरकाप उडवणारी घटना
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement