कोकी... नाव वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. कोकी हा काय प्रकार आहे, कसा बनवला जातो, चवीला कसा लागतो असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. कोकीची रेसिपी पाहण्यासाठी आपण आधी त्याबाबत थोडी माहिती घेऊयात.
advertisement
कोकी ही सिंधी लोकांची पारंपरिक रोटी किंवा पराठा आहे. पण ती सामान्य पराठ्यासारखी नसून जाड, कुरकुरीत, खमंग आणि मसालेदार असते. यात पाणी खूप कमी वापरतात. पीठ कडक मळलं जातं, त्यामुळे कोकी जास्त वेळ ताजी राहते, ती जाडसर लाटली जाते. कमी आचेवर तूप किंवा तेलात चांगली कुरकुरीत भाजली जाते. बाहेरून कुरकुरीत, आतून हलकी मऊ असते. सकाळच्या नाश्त्यात, प्रवासात किंवा लंच बॉक्समध्ये खूप लोकप्रिय आहे.
आता कोकीबाबत इतकं वाचल्यानंतर ती खायची उत्सुकता तुम्हालाही असले. पण त्यासाठी ती बनवावी लागेल आणि त्यासाठी त्याची रेसिपी लागेल. चला तर मग कोकी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं आणि ती कशी बनवायची त्याची कृती पाहुयात.
साहित्य (2-3 लोकांसाठी)
गव्हाचं पीठ - 2 कप
कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेली)
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
जिरे – 1 टीस्पून
धणे पूड – 1 टीस्पून
लाल मिरची पावडर – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल / तूप – 2 टेबलस्पून (पीठात) + शेकण्यासाठी
पाणी – कमी प्रमाणात
कोकी कशी बनवायची? कृती
गव्हाच्या पिठात कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरं, धणे पूड, लाल मिरची, मीठ घाला. आता 2 टेबलस्पून तेल किंवा तूप घालून हाताने चांगलं मिक्स करा. खूप कमी पाणी घालून कडक पीठ मळा. पराठ्याच्या पिठापेक्षा कडक हवं. पीठ 10–15 मिनिटं झाकून ठेवा. यामुळे कोकीची टेक्स्चर परफेक्ट येते. आता पिठाचे मध्यम गोळे करा. सुरुवातीला पॅटीससारखे लाटून गॅसवर तवा गरम करून दोन्ही बाजूंनी हलकं शेकवून घ्या. आता हे पॅटीस पराठ्यासारखे जाड लाटून घ्या. कडा जाड राहिल्या तरी चालतील. कोकी तशीच छान लागते. त्यावर काटा चमच्याने टोचे मारून घ्या. तवा मीडियम गॅसवर गरम करा. कोकी तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूने हलकं भाजा. नंतर थोडं तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूंनी चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
Weird Recipe Video : कांदा-बटाटा नाही तर ओरिओ भजी; आवडीने खातात लोक, मुलांची आहे फेव्हरेट
तूप, लोणचं, दही, चटणी किंवा मसाला चहासोबतही कोकी छान लागते. यासोबत तुम्ही सर्व्ह करू शकता. तुम्ही कधी कोकी खाल्ली होती का? नाहीतर एकदा बनवून पाहा आणि कशी झाली आम्हाला नक्की सांगा.
