Celebrity Recipe : समांथाने बनवलं फिल्टर कॉफी चिया पुडिंग; फक्त नावच हार्ड पण बनवायला एकदम सोपी रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Samantha Recipe Video : अगदी काही क्षणात समांथाने ही रेसिपी बनवली आहे. अगदी लहान मुलंही ही रेसिपी बनवू शकतात इतकी सोपी. यासाठी गॅसचीही गरज नाही.
अभिनेत्री समांथा रूथ प्रभू तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. याचदरम्यान तिची ही खास रेसिपीही. समांथाचा एक रेसिपी बनवतानाचा व्हिडीओ आहे. ज्यात तिने तिची आवडता पदार्थ सांगितला आहे. फक्त सांगितलाच नाही तर तिने तो बनवूनही दाखवला आहे. हा पदार्थ आहे फिल्टर कॉफी चिया पुडिंग.
फिल्टर कॉफी चिया पुडिंग... नाव वाचूनच तुम्हाला याची रेसिपी किती कठीण असेल असं वाटलं असेल. पण समांथाच्या या आवडत्या पदार्थाची रेसिपी एकदम सोपी आहे. इतकी की तुम्ही विचारही केला नसेल. अगदी काही क्षणात समांथाने ही रेसिपी बनवली आहे. अगदी लहान मुलंही ही रेसिपी बनवू शकतात इतकी सोपी. आता तर हे रेसिपी पाहण्याची तुमची उत्सुकता अधिक वाढली असेल.
advertisement
साहित्य
सब्जा - अर्धा कप
मॅपल सिरप किंवा जॅगरी सिरप - अर्धा कप
कोकोनट मिल्क - दीड कप
स्ट्राँग फिल्टर कॉफी - अडीच टेबलस्पून
कोको पावडर - पाव कप
कोकोनट मिल्क
कृती
मॅपल सिरप किंवा जॅगरी सिरप, कोकोनट मिल्क, स्ट्राँग फिल्टर कॉफी सगळं मिक्स करा. आता यात कोको पावडर टाकून नीट मिक्स करा. आता शेवटी सब्जा टाकून ढवळा. सब्जा यात आपल्याला भिजत ठेवायचा आहे. मिश्रण खूप घट्ट वाटत असल्यास दोन चमचे पाणी घाला.
advertisement
हे मिश्रण रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवा. णेकरून ते सेट होईल आणि घट्ट होईल आणि थंड होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व्ह करा. त्यावर थोडे चिरलेले ड्राय फ्रूट्स, ग्रॅनोला आणि चॉकलेट चिप्स घालून त्याचा आनंद घेऊ शकता.
advertisement
उपासना कोनिडेलाच्या ‘युअर लाइफ’च्या एका भागात समांथाने ही रेसिपी दाखवली आहे. तुम्ही हे रेसिपी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
December 01, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Celebrity Recipe : समांथाने बनवलं फिल्टर कॉफी चिया पुडिंग; फक्त नावच हार्ड पण बनवायला एकदम सोपी रेसिपी


