ठाणे: उन्हाळा सुरू झाला की थंडगार गोळा खाण्याचा आनंद अनेकांना हवाहावासा वाटतो. डोंबिवलीतील राधे मलाई गोला सेंटर हे ठिकाण खवय्यांचं आकर्षण केंद्र आहे. 1997 पासून हा मलाई गोळेवाला स्टॉल तिथेच असून हा स्टॉल सांभाळणारी ही दुसरी पिढी आहे. या गोळेवाल्याकडे 20 ते 30 प्रकारचे विविध फ्लेवरमधील गोळे खायला मिळतात. विशेष म्हणजे अगदी 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंतचे हे गोळे खाण्यासाठी डोंबिवलीकर या ठिकाणी गर्दी करत असतात.
advertisement
खवय्यांना आकर्षित करणारा स्टॉल
डोंबिवली पश्चिमेला स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भाग मैदानजवळ हा गोळेवाल्याचा स्टॉल आहे. राजभोग डिलक्स आणि मिक्स ड्रायफ्रूट मलाई हे गोळे इथले सर्वात अस्सल आणि खास आहेत. या गोळ्यांमध्ये तुम्हाला ब्लू बेरी, रोझ, रबडी मलाई, बेदाणे, काजू आणि ड्रायफ्रूट सारखे अनेक फ्लेवर चाखायला मिळतील. इथे गोळ्याची किंमत 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत फ्लेवरनुसार आहे. विशेष म्हणजे इथून तुम्हाला हवा असलेला गोळा घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करूनही मागवता येतो, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
मलाई गोळ्याचे फ्लेवर आणि किंमत
राधे मलाई गोला सेंटर येथे फ्लेवरनुसार गोळ्याची किंमत आहे. याठिकाणी चॉकलेट मावा मलाई गोळा 100 रुपये, चॉकलेट मावा ड्रायफ्रुट मलाई गोळा 120 रुपये, बटरस्कॉच मलाई गोळा 100 रुपये आणि मँगो मावा मलाई गोळा100 रुपयांपासून मिळतो. तसेच साध्या गोळ्यांमध्ये चम्मच गोळा, साधा गोळाही मिळतो. तसेच केशर पिस्ता, डिलक्स स्पेशल, असे अनेक प्रकारचे मावा आणि ड्रायफ्रूटवाले गोळे देखील याठिकाणी मिळतात. ज्यांची किंमत ही 100 ते 200 रुपयांपर्यंत आहे. या स्टॉलवर तुम्हाला अनेक प्रकारचे सरबतही मिळतील, असेही विक्रेता राधे यांनी सांगितले.
वडिलांचं निधन अन् संकटांचा डोंगर, लेकीनं मसाला पापड विकून सावरलं घर
राजभोग मलाई गोळ्याला मोठी मागणी
राधे स्टॉलवर मलाई गोळा, मावा गोळा यांना मागणी असते. तसेच इथला रोजभोग मालई गोळा चवीला खूप खास असल्याचं खवय्ये सांगतात. त्यामुळे जर तुम्हीही थंडगार गोळ्याचे शौकीन असाल आणि नेहमीच्या गोळ्यापेक्षा जर वेगळा गोळा चाखून बघायचा असेल तर तुमच्यासाठी मलाई आणि मावा गोळ्यातील हे फ्लेवर अगदी उत्तम पर्याय आहे.