फूड, कपड्यांचा ट्रक आता जुनं झालं, 'या' मार्केटमध्ये फेमस आहे पान ट्रक, 40 प्रकारचे मिळतात विडे Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान पाहायला मिळतील आणि तेही अगदी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई : आपण सर्वांनीच फूड ट्रक, कपड्यांचा ट्रक, भाजीपाल्याचा ट्रक पाहिले आहेत. एवढचं काय आता तर फूड ट्रक पण भलतेच फेमस होत आहेत. पण पान ट्रक कधी पाहिला आहे का? कारण असे पान ट्रक फारच कमी पाहायला मिळतात. पण मुंबईतील दादर पूर्वेला स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर जे हिंदमाता मार्केट सुरु होतं. त्यामार्केट मधील शिवनेरी इमारतीच्या समोर हा पान ट्रक उभा असतो. या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान पाहायला मिळतील आणि तेही अगदी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
या पान ट्रकचं नाव फेल्वर ट्रक आहे. या ट्रकचे मालक सत्यम हे आहेत. त्यांनी हा पान ट्रक 2012 मध्ये सुरु केला होता. स्विट म्हणजे गोड पान, चटणी पान, पान अरोमा स्पेशल, फ्लेवर पान, खुल्फी पान फायर पान, लड्डू पान, व्हिआयपी पान, स्मोक पान, लहान मुलांसाठी स्पेशल पान असे अनेक प्रकारचे पान पाहायला मिळतात. या पानांची किंमत 35 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत आहे. इथे 2100 रुपयांचं फर्स्ट नाईटपानही फेमस आहे. पण हे पान ते ऑर्डर प्रमाणेच बनवतात.
advertisement
खान्देशातील प्रसिद्ध पदार्थ आता पुण्यातही उपलब्ध, चव अशी की एकदा खाल तर परत जाल
पानाचे प्रकार आणि किंमत
लहान मुलांसाठी मिळणारं पान - ओरिओ फ्लेवरमध्ये पान मिळतात. 30 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे.
व्हिआयपी पान - शाही पान, राजवारीपान, माया पान, शाही ड्राय फ्रूट पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 120 ते 1100 रुपयांपर्यंत किंमत आहे.
advertisement
लड्डू पान- लड्डू कोकोनट पान, लड्डू डेरी मिल्क पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 30 रुपयांपासून ते 40 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे.
वडिलांचं निधन अन् नोकरीही गेली, मसाला पापड विकून लेकीनं पुन्हा उभं केलं घर, Video
स्मोक पान- ओरिओ स्मोक पान, स्विट स्मोक पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 70 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे.
advertisement
फ्लेवर पान- चॉकलेट पान, ऑरेंज पान, मॅंगो पान, बटचस्कॉच पान, कॉफी पान, इलाईची पान, मसाला टी पान अशा प्रकारचे अनेक फ्लेवरचे पान मिळतात. 50 रुपयांपासून यांची किंमत आहे.
कुल्फी पान- मॅंगो कुल्फी पान , चॉकलेट कुल्फी पान, बटरस्कॉच कुल्फी पान, असे अनेक प्रकारचे पान मिळतात. किंमत 70 रुपयांपासून आहे.
फायर पान- यातही अनेक फ्लेवरमध्ये फायर पान मिळतात. 40 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत हे पान आहेत.
advertisement
मक्याचे दाणे अन् चिली फ्लेक्स; तुम्ही कधी खाल्लीये का पिझ्झा पाणीपुरी? पाहा कुठे मिळतीय भन्नाट ही डिश
स्विट पान- मिठा पान, सिल्वर मिठा पान, मिठा ड्राय फ्रूट पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 15 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे.
चटणी पान- मॅंगो चटणी पान, स्ट्रॉबेरी चटणी पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 35 रुपयांपासून यांची किंमत आहे.
advertisement
पान अरोमा स्पेशल - फर्स्ट नाईट पान, पेढा पान, गोल्ड पान, फॅमेली पान असे अनेक प्रकारचे पान मिळतात. 40 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत यांची किंमत आहे, असं सत्यम यांनी सांगितलं.
तुम्हाला जर नेहमीपेक्षा काही वेगळ्या प्रकारचे पान ट्राय करायचे असतील तर तुम्ही अशा पान ट्रकला नक्की भेट देऊ शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 04, 2024 2:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
फूड, कपड्यांचा ट्रक आता जुनं झालं, 'या' मार्केटमध्ये फेमस आहे पान ट्रक, 40 प्रकारचे मिळतात विडे Video