खान्देशातील प्रसिद्ध पदार्थ आता पुण्यातही उपलब्ध, चव अशी की एकदा खाल तर परत जाल

Last Updated:

महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. खान्देशातील हा प्रसिद्ध पदार्थ पुण्यात मिळत आहे.

+
News18

News18

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये काही खास पदार्थ मिळतात. हे पदार्थ त्यांच्यातील वेगळेपणानं त्या भागाची खास ओळख बनली आहेत. खान्देशातील लग्नामध्ये आवर्जून खाल्ला जातो तो पदार्थ म्हणजे वरण बट्टी. खान्देशातील हा वरण बट्टी पदार्थ पुण्यात खान्देशी जंक्शन या हॉटेलमध्ये खायला मिळतो. या ठिकाणी वरण बट्टी खाण्यासाठी मोठी गर्दी असते.
advertisement
पुण्यातील नारायण पेठ येथे असलेल्या खान्देशी जंक्शन या हॉटेल मालक निलेश चौधरी आहेत. या हॉटेलची सुरुवात त्यांनी 15 वर्षांपूर्वी केली होती. याबद्दल माहिती देताना निलेश चौधरी यांनी सांगितले की, मी मूळचा भुसावळचा आहे. आमच्याकडे वरण बट्टी वांग्याच भरीत हे लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यामुळे वरण बट्टी बनवायला मी माझ्या हॉटेलमध्ये सुरु केली. यासाठी लागणार जे साहित्य आहे ते सगळं भुसावळ वरून मागवलं जातं. यामध्ये गहू, मका असे सगळ्या गोष्टी या गावावरूनच मागवल्या जातात. वरण बट्टी गुरुवार आणि शनिवार आमच्याकडे मिळते. एका थाळीची किंमत 130 रुपये आहे.
advertisement
कशी बनते वरण बट्टी? 
गव्हाचे पीठ, मका पीठ, जाड रवा, गव्हाचे जाड पीठ, ओवा, जीर, चवीनुसार मीठ, हळद, तेल, बट्टी कणिक मळण्यासाठी अर्धा ग्लास कोमट पाणी घेतलं जातं. तसच बट्टी बनवण्यासाठी परातीमध्ये सर्व पीठ जीरे ओवा मीठ हळद तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागतं. त्यानंतर याची बट्टी बनवून घ्यावी लागते. बट्टी तयार झाली की एका बट्टीचे चार भाग करून एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करा त्यामध्ये बट्टी ही तळून घेतली जाते, अशा पद्धतीने मस्त गरमागरम वरण बट्टी तयार करू शकता, असं निलेश चौधरी सांगतात.
advertisement
पुण्यात राहतायत आणि खान्देशी पदार्थ खायचे तर तुम्ही ही वरण बट्टी खायला देखील जाऊ शकता किंवा घरच्या घरी हे साहित्य आणून बनवू शकता. बनवायला देखील अतिशय सोपी अशी ही वरण बट्टी आहे.
मराठी बातम्या/पुणे/
खान्देशातील प्रसिद्ध पदार्थ आता पुण्यातही उपलब्ध, चव अशी की एकदा खाल तर परत जाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement