पुण्यातील भोरी आळी सोन्या मारुती जवळ 'जय शंकर महाराज पावभाजी सेंटर' आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खाडिलकर दाम्पत्य हे सेंटर चालवत आहे. जगभरातील विविध पदार्थ ते आपल्या गाड्यावर विकत असतात. युरोप आणि अमेरिकेत प्रसिद्ध असणारा हॉट डॉग त्यांनी पुण्यात सुरू केला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हा पदार्थ पुणेकरांना चाखायला मिळतो आहे.
advertisement
अरेबिक कुनाफा आता पुण्यात; एकाच ठिकाणी घ्या 10 प्रकारचा आस्वाद
कसा बनवतात हॉट डॉग?
सुरुवातीला आम्ही काही कॉलेज मध्ये पफ बर्गर पुरवत होतो. पण मग लॉकडाऊन नंतर गाडी सुरु केली. ही तवा पुलाव व पावभाजीची गाडी होती. पण लोकांना काही तरी नवीन खायला द्यावं म्हणून पनीर चीझ हॉट डॉग पदार्थ सुरु केला. यामध्ये खाली चिझ सॉस, पेरिपेरी सॉस वर थोडा मसाला व पनीर चे देखील काही सॉस आहेत. जे टाकून हे बनवलं जात. याची किंमत ही अगदी सर्वांना परवडेल अशीच आहे. अगदी 60 रुपये मध्ये हा हॉट डॉग मिळतो, असे भक्ती खाडिलकर सांगतात.
पुण्यातील सोन्या मारुती चौक, भोरी आळी या ठिकाणी हा प्रसिद्ध युरोपियन पदार्थ मिळतोय. त्याला खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद आहे. या पदार्थाची चव आणि त्याची किंमत याच बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. आपण अजून हॉट डॉग खाल्लं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा.