या बेकरीत वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे मिळतात आणि त्यांना खास घरगुती चव आहे. कोकोनट बिस्कीट, लांबडी बिस्कीट, नानखटाई, चोको चिप्स, त्रुटीफ्रुटी बिस्कीट अशी अनेक प्रकारची बिस्किटे इथे रोज तयार होतात. त्याचबरोबर स्पेशल बटर आणि जिरा बटर बिस्किटालाही खूप मागणी असते. पण यांचा मावा समोसा हा खरोखर सर्वात फेमस आयटम आहे. सोबतच इथे पाव देखील मिळतात. जुन्या मुंबईकरांना तर हा स्वाद अजूनही तितकाच आवडतो.
advertisement
या बेकरीची एक खास ओळख म्हणजे गुड फ्रायडेसाठी बनवला जाणारा त्यांचा क्रॉस पाव. वर्षातून एकदा मिळणारा हा क्रीम पाव घेण्यासाठी अनेक लोक लांबून येतात. बेकरीचे जुने ग्राहक आजही नियमित येतात. एका ग्राहकाने सांगितलं की, मी तब्बल 50 वर्षांपासून इथे येते. मी लहानपणी आईवडिलांसोबत इथे बिस्कीट आणि पाव घ्यायला यायचे. आज मी शिवडीहून खास इथला हॉट डॉग पाव आणि विट पाव घ्यायला येते. यांची चव अजूनही तशीच आहे.
फक्त बिस्किटे आणि पावच नाही तर या बेकरीमध्ये विविध प्रकारचे केकही मिळतात. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांसाठी ते ऑर्डर घेऊन केक बनवतात.
इतकी वर्षे झाली तरीही ही बेकरी लोकांच्या मनात तितकीच प्रिय आहे. नवे ब्रँड, नवी दुकाने आली, तरी या छोट्या पर्शियन बेकरीची चव आणि परंपरा लोक आजही विसरलेले नाहीत. म्हणूनच दादरच्या हिंदमातातील ही बेकरी अजूनही तितक्याच प्रेमाने आणि विश्वासाने चालत राहिली आहे.





