Success Story : 5 महिन्यांत 5 लाख निव्वळ नफा! शेतकरी करतोय फायद्याची शेती, तुम्ही करू शकता असा प्रयोग Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
त्र्यंबक डिगे हे मागील अनेक वर्षांपासून आपली पारंपरिक शेती करत आहेत. परंतु मागील काही वर्षांत त्यांना शेड नेट शेतीचा छंद जडलाय.
जालना : महिन्याला लाख रुपये कमावणाऱ्या नोकरदार व्यक्तीविषयी आपल्याला कुतूहल असते. एखादा सामान्य शेतकरी महिना लाख रुपये कमवतो असं म्हटलं तर..! तुम्ही ही शॉक झालात ना. पण हो हे खरंय. चला तर मग पाहुयात कोण आहे हा अवलिया शेतकरी आणि तो नक्की पिकवतो तरी काय.
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील चितोडा या छोट्याशा गावातील त्र्यंबक डिगे हे मागील अनेक वर्षांपासून आपली पारंपरिक शेती करत आहेत. परंतु मागील काही वर्षांत त्यांना शेड नेट शेतीचा छंद जडलाय. या शेतीत ते शिमला मिरची, दोडका यांसारखी पिके घेतात. त्यांच्या 15 एकर पारंपरिक पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही अधिक उत्पन्न त्यांना केवळ एक एकरात केलेल्या शेड नेट शेतीतून मिळते.
advertisement
मागील चार वर्षांपासून ते शेड नेटमध्ये दोडका पीक घेत आहेत. या पिकावर पाच महिन्यांत 80 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो. परंतु, आश्चर्यकारक उत्पादन देखील मिळते. केवळ 20 गुंठ्यांत ते 150 ते 200 क्विंटल दोडका उत्पादन करतात. या दोडक्याला शेतावरच 35 ते 50 रुपये किलो दर मिळतो. खर्च वजा केल्यास त्यांना या पिकातून तब्बल 5 लाख नफा केवळ 5 महिन्यांत मिळतो.
advertisement
शेती ही उद्योग म्हणून केल्यास नक्कीच फायदा होतो. पारंपरिक पिके कमी करून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करावेत, असं आवाहन डिगे नवीन शेतकऱ्यांना करतात.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 27, 2025 3:28 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 5 महिन्यांत 5 लाख निव्वळ नफा! शेतकरी करतोय फायद्याची शेती, तुम्ही करू शकता असा प्रयोग Video

