लसूण सेवनाची वेगवेगळी पद्धत आहे. अनेकांना भाजलेला लसूण खायला आवडतो, तर काही लोक जेवणात लसूण घालून ते खातात. बरेच लोक लसूण चटणी बनवून त्याचा आनंद घेतात. आता लसूण खाण्याची एक पद्धत म्हणजे लसूण भुरका. मराठवाड्यातील ही रेसिपी आहे. आता यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती कशी बनवायची पाहुयात.
Besan Milk Recipe Video : हिवाळ्यासाठी खास बेसन दूध, पिताच हुडहुडत्या थंडीत गाढ झोप लागेल
advertisement
लसूण भुरका बनवण्यासाठी साहित्य
तेल 3 टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
लसूण 25-30 पाकळ्या
तीळ 1 टेबलस्पून
शेंगदाणा कुट 1 टेबलस्पून
कोंथिबीर मुठभर
तिखट 2 टेबलस्पून
मीठ चवीनुसार
लसूण भुरका बनवण्याची कृती
गॅसवर कढई ठेवा, त्यात तेल टाका. तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाका. मोहरी तडतडली की जिरं टाका. आता लगेच लसूण ठेचून किंवा बारीक चिरून टाका. गॅसचा विस्तवर कमी ठेवा लसूण गुलाबी होईपर्यंत परता. आता पांढरे तीळ टाकून ढवळून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीर ओली आहे, त्यातील ओलेपणा कमी करायचा आहे. कोथिंबीर कुरकुरीत झाली की भुरका बरेच दिवस टिकतो. आता शेंगदाण्याचं कूट टाका. गॅस बंद करून यात लाल तिखट आणि मीठ घालून नीट मिक्स करून घ्या. गॅस चालू ठेवलं तर तिखट करपेल. एक मिनिटभर परतल्यानंतर तुमचा भुरका तयार.
Dink Gond Recipe Video : डिकांचे लाडू नेहमीच खाता, या थंडीत ट्राय करा डिंकाचा चहा
पोळी, भाकरी, धपाटे, थालीपीट, वरण-भातासोबत भाजी नसेल तर तोंडी लावण्यासाठीही हा भुरका मस्त. युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
तुम्ही ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लसणीपासून तुम्ही अशी आणखी काय रेसिपी करता तीसुद्धा आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका.
