नवी दिल्ली : अनेकजण आपल्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीने करतात. जास्त प्रमाणात चहा, कॉफी पिऊ नये, असं आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. मात्र काहीजण कॉफीमध्ये तूप घालून पितात. आजकाल सोशल मीडियावरसुद्धा ही कॉफी भलतीच फेमस झालीये. या कॉफीचे आरोग्याला काही फायदे होत असतील का? जाणून घेऊया डॉक्टरांकडून...
डॉक्टर टीना कौशिक सांगतात, कॉफी आणि तूप हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. तुपात हेल्थी फॅट्स असतात. ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं, शिवाय शरीर ऊर्जावान राहण्यास मदत मिळते. तर, कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे शरीर आणि मन दोन्ही ऍक्टिव्ह राहतं. असं म्हणतात की, तुपामुळे वजन वाढतं. मात्र खरंतर डाएटमध्ये तुपाचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. शिवाय तुपात असलेल्या फॅटमुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकतं.
advertisement
हेही वाचा : कडू कारलं डायबिटीजवर भारी! लिव्हरचा भारही करतं कमी
अन्नपचनास फायदेशीर :
तुपाच्या कॉफीमुळे अन्नपचन सुरळीत होतं. शिवाय आतड्या भक्कम होण्यास मदत मिळते. महत्त्वाचं म्हणजे यामुळे हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि मूड आपोआप फ्रेश होतो. नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल विरघळण्यासही तुपाची कॉफी फायदेशीर ठरते.
कोणी पिऊ नये कॉफी?
डॉक्टर टीना कौशिक यांनी सांगितलं की, कॉफीमध्ये तूप मिसळून पिणं सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकतं. परंतु ज्यांना एखादा आजार असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ही कॉफी प्यावी.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.