कडू कारलं डायबिटीजवर भारी! लिव्हरचा भारही करतं कमी

Last Updated:

कारलं आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त असतं. कारण त्यात व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फॉलेट, जिंक, फॉस्फरस आणि मॅगनीज असे अनेक गुणधर्म असतात.

लिव्हरमधून फॅट कमी होतात.
लिव्हरमधून फॅट कमी होतात.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : एका ठराविक वयानंतर शरिराला विविध आजार जडतात. डायबिटीज त्यापैकीच एक. परंतु आता अगदी शाळकरी मुलांमध्येही हा आजार आढळतो. त्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावेच, परंतु आपला आहारही सकस असायला हवा. कारलं तर डायबिटीजमध्ये अत्यंत फायदेशीर ठरतं.
कारलं अनेकजणांना आवडत नाही. लोक कारल्याचं नाव ऐकूनच नाक-तोंड मुरडतात. तर, काहीजण मात्र कारलं अत्यंत आवडीनं खातात. खरंतर हे कडू कारलं आरोग्यासाठी प्रचंड उपयुक्त असतं. कारण त्यात व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फॉलेट, जिंक, फॉस्फरस आणि मॅगनीज असे अनेक गुणधर्म असतात.
advertisement
विशेषतः डायबिटीजच्या पेशंटसाठी कारलं रामबाण मानलं जातं. डाइट टू नरिशच्या फाउंडर डायटिशियन प्रियंका जायसवाल सांगतात, कारल्यात असलेल्या मोमर्सिडीन आणि चरनटीनमुळे रक्तातली ग्लुकोज लेव्हल कमी होऊ शकते. कारल्यात पॉलीपेप्टाइड-पी म्हणजेच पी-इंसुलिन असतं, ज्यामुळे नैसर्गिकरित्या डायबिटीज कमी होण्यास मदत मिळू शकते. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासही कारलं फायदेशीर ठरतं. जर दररोज कारलं खाल्लं तर हळूहळू वजन कमी होऊ शकतं.
advertisement
कारल्यात अँटिइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे लिव्हरला आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते. लिव्हरमधून फॅटही प्रभावीपणे कमी होतात. त्याचबरोबर कारल्याच्या सेवनानं शरिरातले टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. ज्यामुळे लिव्हरवरचा भार कमी होतो. विशेष म्हणजे कारल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यासही मदत मिळते. शिवाय हृदय सुदृढ राहतं.
advertisement
कारल्याचे वेफर्स बनवून खाऊ नये, जास्त तेलात तळून तर अजिबात खाऊ नये. कारलं उकडून किंवा त्याची भाजी बनवून खाणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर आपण कारल्याचा रसही पिऊ शकता, मात्र ज्यांची पचनशक्ती कमकुवत असेल, त्यांनी कारल्याचा रस पिऊ नये, असं प्रियंका यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
कडू कारलं डायबिटीजवर भारी! लिव्हरचा भारही करतं कमी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement