TRENDING:

तुम्हालाही शुगर आहे का? मग मेथीच्या दाण्यांचं लोणचं नक्की ट्राय करा

Last Updated:

आपण मेथीच्या दाण्याचं लोणचं कधी खाल्लंय का? मग शुगरवर उपयुक्त असणारं लोणचं नक्की ट्राय करा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 3 ऑगस्ट: आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडतं. मात्र तुम्ही कधी मेथीचे लोणचं बघितलं आहे का? विशेषतः तुम्हाला शुगर किंवा संधिवात आहे का? अशा रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मेथीचे दाणे अतिशय कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही. त्यामुळे मेथीच्या दाण्यांचं लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी शालिनी अलोणे यांनी मेथीचे लोणचं नेमकं बनवायचं कसं ते सांगितलं आहे.
advertisement

मेथीच्या लोणच्यासाठी साहित्य

मेथीचे दाणे हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. थंडीच्या दिवसात मेथीचे दाणे सेवन करण्याचे अनेक फायदे सांगितले जातात. लोणच्याच्या माध्यमातून मेथीचे दाणे खाल्ल्याने तुमच्या शरीरालाही फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे अगदी पाच मिनिटात तयार होणारं हे लोणचं आहे. मेथीचं लोणचं बनवण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचीच गरज आहे. अर्धी वाटी मेथीचे दाणे, फोडणीसाठी हळद, तिखट, मीठ, मोहरीचे दाणे, जिरे, मोहरीची डाळ आणि लिंबाचा रस हे साहित्य लागेल,

advertisement

कसं बनवाल मेथीचं लोणचं?

सर्वप्रथम एक दिवसआधी तुम्हाला मेथीचे अर्धी वाटी दाणे भिजत घालायचे आहेत. त्याला मोड आल्यानंतर त्याला सुकवून घ्यायचे. त्यात पाणी राहता कामा नये. एका फोडणीच्या भांड्यात तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात, मोहरी, जिरे, मोहरीची डाळ ऍड करायची. या तीन वस्तू तडतडल्यानंतर गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर त्यात तिखट हळद मीठ ऍड करायचं. जेणेकरून गरम तेलात ते जळणार नाही. नंतर मोड आलेल्या सुकवलेल्या मेथीच्या दाण्यांमध्ये ही फोडणी टाकून चांगलं एकत्र करायचं. त्यात लिंबूचा रस पिळायचा आणि झाकून ठेवायचं. आता हे मेथीच्या दाण्यांचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे.

advertisement

सण उत्सवाला गोडधोड करायचंय? नक्कीच ट्राय करा चिरवंट

20-30 दिवस टिकू शकतं लोणचं

मेथीच्या दाण्याचं लोणचं एक महिन्याच्या वर राहू शकत नाही. खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त बनवून ठेवू नये, असा सल्ला देखील गृहिणी शालिनी अलोने यांनी दिला. 20 ते 30 दिवस पुरेल एवढं अर्धी वाटी लोणचं करून ठेवण्यास हरकत नाही. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे लोणचं अनेक जण आवडीने खातात. जर तुम्हालाही संधिवात किंवा शुगरचा त्रास असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचं लोणचं खाणं अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं जातं. नुसतं मेथीच्या बिया खाणं शक्य होत नाही कारण त्याची कडवट चव सहज खाणे शक्य नसते. त्यामुळे या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्हीही नक्कीच मेथीचं लोणचं ट्राय करू शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
तुम्हालाही शुगर आहे का? मग मेथीच्या दाण्यांचं लोणचं नक्की ट्राय करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल