सण उत्सवाला गोडधोड करायचंय? नक्कीच ट्राय करा चिरवंट

Last Updated:

सण उत्सवात घरात गोडधोड काय करायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा स्वादिष्ट चिरवंट नक्की ट्राय करू शकता.

+
सण

सण उत्सवाला गोडधोड करायचंय? नक्कीच ट्राय करा चिरवंट

वर्धा, 2 ऑगस्ट: सण उत्सवानिमित्त गोडा धोडाचं बनवत असताना काहीतरी नवीन टेस्टी खुसखुशीत पदार्थ बनवण्याची तयारी गृहिणी करत असतात. मात्र आपण नेमकी कोणती डिश बनवावी असा प्रश्न नेहमी असतो. तर यंदाच्या तुमच्या आवडत्या सणाला तुम्ही चिरवंट बनवू शकता. चिरवंट ही रेसिपी अतिशय सोपी आणि घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही लगेच बनवू शकता. ही रेसिपी नेमकी कशी बनवायची हे वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी अगदी सोप्या पद्धतीनं सांगितले आहे.
चिरवंट बनवण्यासाठी साहित्य
चिरवंट बनवण्यासाठीचे साहित्य सर्वांच्याच घरात सहज उपलब्ध असते. त्यासाठी 2 ग्लास मैदा, 200 ग्राम साखर, चवीनुसार मीठ, वेलची पावडर, पाणी, तेल, मोहनासाठी तूप आदी साहित्याची आवश्यकता असते.
चिरवंट बनवण्याची रेसिपी
सर्वप्रथम एका परातीमध्ये मैदा घ्या त्यात मीठ आणि मोहनाचं वाटीभर तूप टाका. त्यात वेलची पावडर ऍड केल्यानंतर सर्व मैदा हा मोहनाच्या तुपात चांगला एकत्र करून घ्या. त्यानंतर पाण्याने त्याचा घट्ट गोळा बनवून घ्या. दुसरीकडे एका वाटीत थोडासा मैदा त्यात तूप घालून साटा तयार करून घ्या. (साटा करण्यासाठी मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता). त्या गोळ्याच्या 3-4 पात्या लाटून ठेवा.
advertisement
एका पोळीवर साटा लावून घ्या. त्यानंतर दुसरी पोळी घेऊन पुन्हा साटा लावून अशाप्रकारे तीन-चार पोळ्यांचा थर करून घ्या. आता त्याला रोल करून घ्या. या रोलला चाकूने कट करा. तुमच्या आवडीप्रमाणे त्याला आडवे किंवा उभे प्रेस करू शकता. उभे प्रेस केल्याने त्याचे लेयर्स चांगले दिसतात. आता हे गोल चिरोटे तेलात तळून घ्या. तळल्यानंतर चिरोट्यांवर तुम्ही पाक टाकू शकता किंवा पाकात चिरोटे टाकू शकता. अशाप्रकारे खुसखुशीत गोड चिरोटे तयार आहेत.
advertisement
घरात नक्की ट्राय करा
मैदा, साखर, मीठ, वेलची पावडर, पाणी, तेल, या वस्तू सहजच सर्वांच्या घरी उपलब्ध असतात. त्यामुळे जर काहीतरी गोडधोड आणि खुसखुशीत खाण्याची इच्छा असेल तर चिरवंट बनवण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. त्यामुळे कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. विशेषतः घरात सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी सण उत्सवाला किंवा इतर वेळेतही नक्कीच ट्राय करू शकता.
मराठी बातम्या/Food/
सण उत्सवाला गोडधोड करायचंय? नक्कीच ट्राय करा चिरवंट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement