TRENDING:

घरच्या घरी बनवा चटपटीत व्हेज मंच्युरियन, नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी

Last Updated:

मुलांना आवडणारा सध्याचा पदार्थ म्हणजे व्हेज मंच्युरियन. हेच मंच्युरियन घरच्या घरी कसे बनवायचे याचीच रेसिपी गृहिणी छाया शिंदे यांनी सांगितली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

ठाणे : सध्याच्या लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खूप आवडतात. परंतु ते शरीरासाठी चांगले नसल्यामुळे घरच्या घरी त्यांना आवडतील असे पदार्थ बनवावे लागतात. मुलांना आवडणारा सध्याचा पदार्थ म्हणजे व्हेज मंच्युरियन. दुकानात मिळणारे मंच्युरियन सगळ्यांनाच आवडतात. हेच मंच्युरियन घरच्या घरी कसे बनवायचे याचीच रेसिपी गृहिणी छाया शिंदे यांनी सांगितली आहे.

मंच्युरियन बनवण्यासाठी साहित्य 

advertisement

बारीक चिरलेली कोबी, एक वाटी मक्याचे पीठ, मैदा, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे साहित्य लागेल.

गोड, आंबट आणि तिखट पंचामृत घरीच बनवा झटपट, एकदम सोपी रेसिपी

मंच्युरियन बनवण्याची कृती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

सर्वप्रथम कोबी बारीक चिरून स्वच्छ धुऊन घ्यावी. चिरलेल्या कोबीमध्ये एक वाटी मक्याचे पीठ, एक वाटी मैदा, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळे मिश्रण एकत्र करून घ्या. या मिश्रणाचा पिठाचा गोळा बनवण्यासाठी त्यामध्ये थोडे पाणी टाकून पुन्हा मळून घ्या. आता तयार झालेले पीठ दहा मिनिटे झाकून ठेवून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायला घ्या. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हळूहळू बनवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडा. मंच्युरियन सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. आणि त्यानंतर शेजवान चटणी सोबत हे गरमागरम आणि चटपटीत मंच्युरियन तुम्ही खाऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
घरच्या घरी बनवा चटपटीत व्हेज मंच्युरियन, नक्की ट्राय करा अगदी सोपी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल