TRENDING:

Masala Ice Cube : एकदाच बनवून ठेवा 'हे' उन्हाळी स्पेशल आईस क्यूब, सरबत-ताक कोणतंही ड्रिंक इन्स्टंट बनेल

Last Updated:

How to make masala ice cube for instant summer drink : ताक असो किंवा एखादं सरबत त्यासाठी मसाला तर तयार करावाच लागतो, ज्यामुळे ते टेस्टी बनेल. आज आम्ही तुम्हाला यासाठी एक ट्रिक सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा वेळी वाचेल आणि तुम्हाला अगदी रोज सरबत किंवा मसाला ताक प्यायला मिळेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात आपल्याकडे सरबतांची मागणी वाढते. जेवताना ताक, दुपारी एखादं सरबत, घरी कुणी आलं तर नवीन एखादं सरबत किंवा ड्रिंक. हे उन्हाळ्यात ठरलेले. मात्र यासाठी आपल्याला प्रत्येकवेळी खूप तयारी करावी लागत. कारण ताक असो किंवा एखादं सरबत त्यासाठी मसाला तर तयार करावाच लागतो, ज्यामुळे ते टेस्टी बनेल.
उन्हाळी स्पेशल आईस क्यूब बनवण्याची सोपी पद्धत..
उन्हाळी स्पेशल आईस क्यूब बनवण्याची सोपी पद्धत..
advertisement

आज आम्ही तुम्हाला यासाठी एक ट्रिक सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा वेळी वाचेल आणि तुम्हाला अगदी रोज सरबत किंवा मसाला ताक प्यायला मिळेल. इंस्टाग्रामवर maileki_kitchen या अकाऊंटवर एक रेसिपी शेअर केली गेली आहे. त्यामध्ये दाखवलंय की, तुम्ही एकाचवेळी घरात मसाला आईस क्यूब बनवून ठेवू शकता आणि नंतर जेव्हा सरबत किंवा ताक बवायचं असे तेव्हा फक्त ते आईस क्यूब त्यात टाकायचे आणि तुमचं मसालेदार ड्रिंक तयार होतं.

advertisement

उन्हाळी स्पेशल आईस क्यूब बनवण्यासाठी लागणारं साहित्य..

- कोथिंबीर

- पुदिना

- जिरे

- 2-3 हिरव्या मिरच्या

- आले

- चवीनुसार मीठ

- काळे मीठ

- चाट मसाला

- लिंबाचा रस

- बर्फाचे तुकडे

- पाणी

उन्हाळी स्पेशल आईस क्यूब बनवण्याची सोपी पद्धत..

- हे आईस क्यूब बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत किंवा वेळ अजिबात लागत नाही.

advertisement

- यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्या.

- त्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, जिरे, 2-3 हिरव्या मिरच्या, आले, चवीनुसार मीठ, काळे मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, बर्फाचे तुकडे आणि पाणी घाला.

- आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्या.

- त्यानंतर हे मिश्रण गाळणीने व्यवस्थित गाळा.

- आता हे एका आईस ट्रेमध्ये टाका आणि फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.

advertisement

- एकदा आईस क्यूब तयार झाले की तुम्ही ते ट्रेमधून काढून एखाद्या झिप लॉक बॅगमध्ये फ्रिजरमध्ये साठवू शकता.

तुम्हाला सरबत किंवा ताक प्यायचं असेल तेव्हा यातले काही आईस क्यूब काढा आणि त्यामध्ये टाका. तुमचा रिफ्रेशिंग मसाला ड्रिंक तयार होईल, तेही अगदी कमी वेळेमध्ये. तर एकदा हे आईस क्यूब नक्की ट्राय करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Masala Ice Cube : एकदाच बनवून ठेवा 'हे' उन्हाळी स्पेशल आईस क्यूब, सरबत-ताक कोणतंही ड्रिंक इन्स्टंट बनेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल