फोडणी म्हटलं की तेल, मोहरी, जिरं, लसूण, मिरची कडीपत्ता असे पदार्थ येतात. आता खिरीत तर हे पदार्थ पडत नाहीत. मग खिरीला फोडणी कशी काय द्यायची, फोडणीची खीर कशी काय बनवायची असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला तर मग आता थेट रेसिपीच पाहुयात.
Tea Recipe Video : साखर नसेल तर गूळ, पण चहापावडर नसल्यास चहा कसा बनवायचा?
advertisement
गॅसवर कढई ठेवा, गरम झाली की त्यात चमचाभर तूप टाका. आता यात तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवेत ते बारीक तुकडे करून टाका. ड्रायफ्रुट्स तुपात चांगले परतून घ्या. नंतर यात भाजलेल्या शेवया टाकून थोड्या परता. आता वरून दूध ओता. आता हे दू उकळू द्या.
तोपर्यंत फोडणीचं भांडं घ्या. फोडणीचं भांडं नसेल तर तुम्ही जे कोणतं भांडं वरून फोडणी देण्यासाठी वापरत असाल ते घ्या. त्यात साखर घ्या आणि ही साखर वितळवून घ्या. मधे मधे ढवळत राहा म्हणजे ती तळाला चिकटणार नाही. साखरेला पाणी सुटत असल्याचं तुम्हाला दिसेल. काही वेळाने साखर पूर्णपणे वितळेल तिचा रंगही बदललेला दिसेल.
Tomato : टोमॅटोचा हलवा, विचित्र वाटेल पण अनेकांनी ट्राय केलाय, हा घ्या Recipe Video
आता ही वितळवलेली साखर शेवया टाकून उकळवत ठेवलेल्या दुधात हळूहळू ओतून ते दूध ढवळा. म्हणजेच आपल्याला खिरीला साखरेची फोडणी द्यायची आहे.
सामान्यपणे खीर बनवताना आपण त्यात साखर टाकतो. पण अशा पद्धतीने ती विरघळवून टाकली की त्याचं टेक्स्चर आणि चव दोन्ही छान होत असल्याचं या महिलेने सांगितलं आहे. 10 मिनिटं उकळवून घ्या. वरून तुम्ही वेलची पूड, जायफळ पावडर टाकून ढवळा. तयार आहे तुमची फोडणीची खीर.
तुम्हीही फोडणीची खीर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
