TRENDING:

विदर्भ स्पेशल सांबार वडी, खायला टेस्टी आणि चटकदारही, नाश्त्याला बनवा घरीच, Video

Last Updated:

सांबार वडी विदर्भातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपारिक पदार्थ आहे. कोथिंबीर म्हणजेच विदर्भात त्याला सांबार म्हणतात. तोच सांबार आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही सांबार वडी विदर्भातील लोकांच्या अतिशय आवडीची आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

अमरावती : सांबार वडी विदर्भातील अतिशय प्रसिद्ध आणि पारंपारिक पदार्थ आहे. कोथिंबीर म्हणजेच विदर्भात त्याला सांबार म्हणतात. तोच सांबार आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही सांबार वडी विदर्भातील लोकांच्या अतिशय आवडीची आहे. सांबार वडी आणि मसाला ताक हा बेत तर विदर्भात सकाळच्या नाश्त्याला कित्येकदा बनवला जातो. सांबार वडी बनवायला थोडा त्रास असला तरीही खायला अतिशय टेस्टी लागते. विदर्भ स्पेशल सांबार वडी कशी बनवायची? ही रेसिपी अमरावतीमधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.

advertisement

सांबार वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा, कोथिंबीर, शेंगदाणे, तेल, हिरवी मिरची, जिरे, ओवा, मीठ, साखर, सोडा, लाल तिखट हे साहित्य लागणार आहे.

हिवाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा झालीये? बनवा शेंगोळे, जिभेला येईल चव

सांबार वडी बनवण्यासाठी कृती

सर्वात आधी आपल्याला सांबार वडीला आवरण बनवण्यासाठी मैदा भिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मैदा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. त्यात ओवा, जिरे, मीठ, सोडा आणि गरम केलेले तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर ते मिश्रण हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं. त्यानंतर ते झाकण ठेऊन बाजूला ठेवायचं.

advertisement

मैदा एकजीव होऊन मऊ होईपर्यंत आपल्याला सांबार वडीचे सारण करून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वात आधी भांड्यात थोडे तेल टाकून ते गरम होऊ द्यायचे. त्यानंतर त्यात जिरे आणि ओवा टाकायचा. त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकायचे. लगेच त्यात शेंगदाण्याचे कूट आणि हिरवी मिरची टाकायची. ते थोडं परतवून घ्यायचं आणि त्यात कोथिंबीर टाकायचं. ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यात मीठ आणि साखर टाकायची. त्यांनतर 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं.

advertisement

तोपर्यंत मैदा छान मऊ झालेला असेल. त्यानंतर वडी भरायला घ्यायची. त्यासाठी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्यात सारण भरायचं. पोळी जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम स्वरूपाची लाटून घ्यायची आहे. सारण सुद्धा जास्त भरायचे नाही. त्यानंतर पोळीला गोल पाणी लावून घ्यायचं. त्यानंतर चारही बाजू फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर सारण भरलेल्या पोळीचा रोल करायचा. रोल झाल्यानंतर ती थोडी हाताने प्रेस करायची. तुमची सांबार वडी तयार होईल. त्यानंतर तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे आणि त्यात सांबार वडी तळून घ्यायची. गॅस मध्यमच ठेवायचा. सोनेरी रंग येईपर्यंत सांबार वडी तळून घ्यायची. तळून झाल्यानंतर तुम्ही ती वडी मसाला ताक किंवा रस्स्यासोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी लागते.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
विदर्भ स्पेशल सांबार वडी, खायला टेस्टी आणि चटकदारही, नाश्त्याला बनवा घरीच, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल