मुंबई : ''खाने के बाद कूच मीठा हो जाये'' असे म्हणत अनेकांनी जेवणानंतर गोड खाण्याची एक सवयच अंगी लावली आहे. कुठल्याही ठिकाणी जेवायला गेल्यास स्टार्टर, मेनकोर्स आणि डेझर्ट हे तीन प्रकार मिळतात. हाच एक आदर्श प्रकार समजून आपण रोज जेवणानंतर गोड खातो. पण जेवणानंतर खाल्लेला हाच गोड पदार्थ आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे जर वेळेत सावध झाले नाहीत, तर तुम्हालाही टाईप-2 मधुमेह आजार होऊ शकतो.
advertisement
सध्या मधुमेहाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. सोबतच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयोगटाला मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. रोजच्या जीवनातील या साध्या सवयीचा मोठा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. याबाबत आहारतज्ज्ञ आरती भगत यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
लोकल18 बोलताना त्यांनी सांगितले की, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर गोड खाऊ नये. कारण त्या पदार्थात कॅलरीजचे व कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. भारतीय जेवण पदार्थात आधीच जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. त्यात गोड म्हणजेच आणखीन कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. परिणामी शरीरातील इन्सुलिन कमी होते व आपल्या पेशींपर्यंत ग्लुकोज जात नाही. यामुळे मधुमेहाचा धोखा वाढतो.
म्हणून गोड खाण्याची इच्छा असेल तर, आपल्या आहारात जास्त प्रोटीन असलेले पदार्थ आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. यामुळे करून गोड खाल्ल्यास कुठलाही त्रास होणार नाही. अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.