काय झाली घसरण?
आमचा वडिलोपार्जित खवा निर्मितीचा व्यवसाय आहे. मागील अनेक वर्षांपासून मी जालना शहरात खवा घेऊन येत आहे. इथे खव्याला दरही चांगला मिळतो. मात्र, काही दिवसांपासून बाहेरून केमिकल युक्त खवा शहरात येत असल्याने आमच्या उच्च दर्जाच्या खव्याचे दर देखील कमी झाले आहेत. आमच्या दुधाला 80 ते 90 रुपये दर मिळतो मात्र तरीदेखील आम्ही खवा तयार करून तो मार्केटला आणतो यासाठी खूप मेहनत असते मात्र मार्केटला आल्यानंतर 180, 190 ते 220 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे आमची मेहनत वाया जात आहे. आमची सरकारला विनंती आहे की, केमिकल युक्त खव्याची विक्री करणाऱ्या वर कारवाई करावी, असं खवा विक्रेते राजू काटकर यांनी सांगितलं.
advertisement
आला थंडीचा महिना, चपाती नको ही गरिबांची भाकरी सगळ्यात बेस्ट, भावही वाढला
परवडत नाही
मी मागील 50 वर्षांपासून खवा विक्रीचा व्यवसाय करतो सरासरी खव्याला 250 ते 300 रुपयांचादर मिळतो. मात्र, सध्या दरामध्ये घसरण झाली आहे. आता 180, 210 ते 220 रुपयांच्या दरम्यान खवा विक्री होत आहे. जसा भाव मिळेल त्या पद्धतीने विक्री करावीच लागते. खरंतर हे परवडत नाही. मात्र दुसरा पर्याय देखील नाही. चांगला भाव मिळाला तर परवडते नाहीतर काहीच उरत नाही असा माझा अनुभव आहे. आमचा हा पारंपारिक व्यवसाय असल्याने त्यातून काही फायदा हो अथवा न हो आम्हाला हा व्यवसाय करावाच लागतो. जालना मार्केट हे खव्यासाठी अतिशय उत्तम आहे. अतिशय उत्तम उच्च दर्जाचा खवा इथे मिळतो. आता थोड्याफार प्रमाणात मिक्स करून खवा आणला जातोय मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचं वरखेडा येथील शेतकरी देविदास आघाव यांनी सांगितलं.