ठाणे : मराठी माणूस आता प्रत्येक व्यवसायात यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. मग तो वडापावचा व्यवसाय असू दे की आणखी काही. मराठी माणूस कधीच मागे हटत नाही. त्यामुळे आज अशाच एका मराठी माणसाच्या जिद्दीची आणि प्रेरणादायी कहाणी आपण आज जाणून घेऊयात.
ठाण्यातील दिवा शहरातील कृपा वडापाव हे दुकान चालवणाऱ्या राकेश चंदरकर यांची ही कहाणी आहे. नाश्ता म्हटलं तर वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तर वडापावची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यानुसार राकेश चंदरकर यांच्या दुकानातील वडापावला सुद्धा खूप मागणी आहे. त्यांच्या दुकानात गिऱ्हाईकांची कायम गर्दी असते.
advertisement
पुण्याच्या ट्रॅफिकमधून काढला मार्ग, आयटी इंजीनिअरचा भन्नाट प्रयोग, नेमकं काय केलं?
कृपा वडापाव या दुकानाचा वैशिष्ट्य काय?
राकेश चंदरकर यांनी 2013 साली एका छोट्या हातगाडीवर कृपा वडापाव या नावाने 10 रुपयाला वडापाव विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे वडापाव, समोसा, भजीपाव हे पदार्थ मिळायचे. हळूहळू लोकांना त्यांचा वडापाव आवडत गेला आणि कृपा वडापाव सर्वांच्याच आवडीचा होत गेला.
वडापाव सोबत इथे मिळणारी मिळणारी तिखट चटणीही खवय्यांना फार आवडते. लॉकडाऊन नंतर राकेश यांनी हात गाडीवरून आपल्या वडापावला नवीन दुकानात आणले. आता त्यांच्या या नवीन दुकानात खवय्यांची आणखीनच गर्दी वाढली आहे.
वडापाव सोबत आणखी कोणते पदार्थ मिळतात?
कृपा वडापाव या दुकानात आता वडापाव सोबतच समोसा, भजीपाव तसेच मिसळपाव, दुपारी जेवणासाठी लागणारी व्हेजथाळी, लस्सी, कांदाभजी हे सर्व पदार्थ मिळतात. आता वडापाव सोबतच दुपारी मिळणारी व्हेजथाळी सुद्धा लोकांच्या आवडीची झाली आहे.
दुकानदार राकेश चंदरकर काय म्हणाले -
'आम्ही सुरुवातीला जेव्हा हातगाडीवर वडापावचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा खरंच विश्वास नव्हता की, तो लोकांना इतका आवडेल. आज जे काही आम्ही नवीन दुकानात कृपा वडापाव सुरू केला आहे, त्याचा सर्व श्रेय हे लोकांचंच आहे. माझ्यासारख्या मराठी माणसाला असंच जर सर्वांची साथ मिळाली तर आम्ही आणखी पुढे जाण्याचा विचार करू,' असे कृपा वडापावचे मालक राकेश चंदरकर यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी! आता घरी बसूनच बुक करता येणार स्मार्टसिटी बसचे तिकीट, काय कराल?
राकेश यांच्या यशाकडे पाहताना मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो याची खात्री पटते आणि नवा आत्मविश्वास मिळतो. तुम्हालाही जर दिव्यातील या प्रसिद्ध वडापावची चव चाखायची असेल तर तुम्हीही कृपा वडापाव याठिकाणी नक्की भेट द्या.