पुण्याच्या ट्रॅफिकमधून काढला मार्ग, आयटी इंजीनिअरचा भन्नाट प्रयोग, नेमकं काय केलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
हिंजवडी परिसरात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. याचा थेट फटका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : पुण्यातीलआयटी नगरी हिंजवडी परिसरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीने सर्वांची डोकेदुखी होते. त्यामुळे यातून सुटका व्हावी यासाठी सांगवीत राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने एक भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. नेमका हा जुगाड काय आहे, यामुळे त्याला कसा फायदा होत आहे, याबाबत लोकल18 च्या टीमने विशेष आढावा घेतला.
हिंजवडी परिसरात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. याचा थेट फटका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो. त्यामुळे काही कर्मचारी हे वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडत आहेत. तर काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळे अगोदरच कंपनीत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याला अपवाद ठरलाय तो सांगवी परिसरात राहणार आर्यकुमार हा आयटी इंजीनिअर.
advertisement
Brahmos Engineer Nishant Agarwal : पाकिस्तानी हेरांनी ब्रह्मोस अभियंत्याचा लॅपटॉप हॅक केला, ते तीन अॅप कोणते?
आर्य कुमार हा दररोज सांगवी ते हिंजेवाडी असा प्रवास करत आहे. वाढती वाहतूक कोंडी, पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव आणि त्यातच वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण यावर उपाय म्हणून, आर्य कुमारने गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या इलेक्ट्रिक सायकलवर प्रवास करत ऑफिस गाठण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याचा हा निर्णय खरोखरच योग्य असल्याचे आता बोलले जात आहे.
advertisement
आर्यची ही सायकल केवळ 35 हजार रुपयांची आहे. तिला महिन्याला केवळ 20 रुपये इतकाच विजेचा खर्च होतो. या सायकलचा वेग ताशी 30 किलोमीटर इतका आहे. वजनाने हलकी असलेले ही सायकल फोल्ड करून कोठेही घेऊन जाता येते. त्यामुळे आर्य कुमार हा वेळेत आपल्या ऑफिसलाही पोहचू लागला आहे.
महत्त्वाची बातमी! आता घरी बसूनच बुक करता येणार स्मार्टसिटी बसचे तिकीट, काय कराल?
आर्य कुमार सारख्या जुगाडू आयटी इंजिनिअरचे आता सर्व स्तरातून कौतुकहोऊ लागले आहे. त्यामुळे इतरही आयटी अभियंते अशाच प्रकारच्या अद्ययावत साधनांचा वापर करून आपल्या कामाला प्रोत्साहन देतील का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे .
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 19, 2024 4:44 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या ट्रॅफिकमधून काढला मार्ग, आयटी इंजीनिअरचा भन्नाट प्रयोग, नेमकं काय केलं?