किसन कांबळे हे वयाच्या 13 व्या वर्षापासून बोकडाच्या मटणापासून आणि चिकनपासून शिक कढाई बनवण्याचे काम करत आहेत. गेल्या 40 ते 45 वर्षांपासून भोजनालय व्यवसाय पुढे नेण्याचे काम आज किसन कांबळे करत आहेत. रूपाभवानी मटन भोजनालयात मटन शिक कढई, चिकन शिक कढाई तसेच मासे पासून सुद्धा शिक कढाई बनवून देण्याचे काम किसन कांबळे करत असून त्यांची ही तिसरी पिढी आहे. 280 रुपये प्रति किलो दराने ही शिक कढई बनवून दिली जाते. तसेच शिक कढाईसोबत खाण्यासाठी या ठिकाणी कडक ज्वारीची भाकरी, नरम भाकरी, जीरा राईस, साधा राईस दिला जातो.
advertisement
रूपाभवानी मटन भोजनालयात शिक कढाई गावरान पद्धतीने चुलीवर बनवली जाते. तसेच मटन आणि चिकन शिक कबाब कोळशाच्या चुलीवर ठेवून बनवलेले जातात, जो कोणी एकदा चुलीवर बनवलेलं कबाब खाईल तो चवीचे कौतुक करताना थकणार नाही. रूपाभवानी मटन भोजनालयाची शिक कढाई आणि शिक कबाब सोलापुरातच नव्हे तर परराज्यातही प्रसिद्ध आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून सुद्धा ही शिक कढई खाण्यासाठी खवय्यांची गर्दी असते. तर या व्यवसायातून किसन कांबळे महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.





