कुठे मिळतीय भेळ?
ठाण्याच्या अष्टविनायक चौकातील स्वादिष्ट नामक या नॉनव्हेज स्टॉलवर चिकन भेळ मिळत आहे. या स्टॉलचे मालक ऋषभ दत्तात्रय पवार आहेत. आजवर फक्त सुका भेळ खाणाऱ्या खवय्यांसाठी ही चिकन भेळ युनिक पदार्थ ठरत आहे. या चिकन भेळची किंमत 70 रुपये आहे. नॉनव्हेज लव्हर खवय्यांच्या अतिशय आवडीच्या या स्टॉलवर चिकन भेळ नामक पदार्थ खवय्यांचे आता मन जिंकत आहे. या चिकन भेळची टेस्ट जबरदस्त आहे.
advertisement
चिकन आणि अंड्यांचे युनिक फ्युजन; ठाण्यात मिळतोय चक्क खिमा घोटाळा Video
चिकन भेळचे काय आहेत वैशिष्ट्य?
70 रुपयात मिळणाऱ्या या भेळीचे खास वैशिष्ट्य म्हणजेच यात तळलेले चिकन वापरले जाते. ही भेळ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. शिजलेल्या चिकनचे बारीक तुकडे मक्याच्या पिठात बुडवून तळून घ्यावे. चिकन तळून झाल्यास त्यांचे आणखीन बारीक काप करावे. गरम तवा घेऊन त्यात अंदाजे तेल घ्यावे. कोबी परतून त्यात ड्राय नूडल्सची शेव आणि चिकनचे काप घ्यावेत. त्यावर शेजवान सॉस, चिल्ली सॉस, सोया सॉस घालून दोन मिनिटे परतून घ्यावे. शेवटी कोथिंबीर घालून ते प्लेटवर सर्व्ह करावे,अशी माहिती या स्टॉलचे मालक ऋषभ दत्तात्रय पवार यांनी दिली आहे.