TRENDING:

पेट्रोल पंपावरील कामगार कसा बनला उद्योजक? सोलापुरी चटणीला परदेशातून मागणी

Last Updated:

सोलापुरातील नसले बंधूंची शेंगा चटणीबरोबर इतर उत्पादने देशातील अग्रेसर मॉलमध्ये विकले जात आहेत. परदेशातही या शेंगा चटणीची चव चाखली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी 
advertisement

सोलापूर : सोलापुरी जेवणाच्या ताटात तुम्हाला इतर पदार्थांबरोबर तीन पदार्थ निश्चित दिसतील. ते पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी, शेंगादाण्याची चटणी आणि मिरचीचा ठेचा. घराघरात असणारा हा मेनू जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरील विविध हॉटेल या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. पण या पदार्थांना कोंडीच्या नसले बंधूनी ब्रँड बनवले आहे. आज नसले बंधूंची शेंगा चटणीबरोबर इतर उत्पादने देशातील अग्रेसर मॉलमध्ये विकले जात आहेत. परदेशातही या शेंगा चटणीची चव चाखली जाते.

advertisement

कधी केली व्यवसायाची सुरुवात? 

मूळचे मराठवाड्यातील मुरूम (जि. धाराशिव) येथील नसले कुटुंब 1973 मध्ये सोलापूर येथे आले. मल्लिनाथ नसले यांनी चार भावंडांसह सोलापूर येथे आल्यानंतर सोलापूर- पुणे महामार्गावर विज्जरगी पेट्रोल पंपावर कामाला सुरुवात केली. त्याच पेट्रोल पंपावर चहाची छोटी टपरी सुरू केली, पंपावर येणाऱ्या ट्रकचालकांच्या जेवणाचीही सोय व्हावी म्हणून सुरुवातीला घरगुती खानावळ चालू केली.

advertisement

पुदिन्याचे पाणी अन् उडीद, मूग डाळीची चवदार पुरी, जालन्यात ‘इथं’ पाणीपुरी खाल तर म्हणालं लय भारी

त्यावेळी सोलापूरसह मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांची संख्या मोठी होती. त्यावरील चालकांना मुंबईला जाऊन येईपर्यंत, प्रवासात खाण्यासाठी सोलापुरी पदार्थ असावा म्हणून दीर्घकाळ टिकणारी ज्वारीची कडक भाकरी आणि शेंगादाण्याची चटणी असा पार्सलचा मेनू चालू केला. याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सुरुवातीला लांबोटी आणि त्यानंतर सोलापूर शहराजवळ कोंडी येथे 1987 मध्ये हॉटेल सुरु केले. सोलापूर - पुणे जाणारे प्रवासी हमखास कोंडी येथे थांबत कडक भाकरी आणि शेंगा चटणीची चव चाखत. तसेच जाताना आपल्या कुटुंबीयासाठी आणि नातलगांसाठी शेंगाचटणी घेऊन जातं. नसले यांच्या चटणीला मिळालेला प्रतिसाद पाहून या परिसरातील इतर हॉटेल व्यावसायिकांनीही शेंगा चटणीची निर्मिती चालू केली.

advertisement

आता बाहेरून महागडा चीज केक आणण्याचे नो टेन्शन, घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारा चीजकेक

अलीकडच्या काळात मुंबई - पुणे येथील ग्राहकांच्या मागणीनुसार सोलापुरी काळे तिखट, लाल मिरची ठेचा, मेतकूट याची निर्मिती केली जात आहे. सोलापूरलगतचे धाराशिव, लातूर, पुणे, सांगली हे जिल्हे आणि कर्नाटक - आंध्रप्रदेशच सीमावर्ती भाग येथे ही चटणी विकली जाते. या चटणीचे चाहते सर्वत्र पसरले आहेत. भारतीय लोक परदेशात जाताना सोबत खास कोंडीची शेंगा चटणी घेऊन जातात. एकावेळच्या जेवणात लागेल यापासून मोठ्या ठोक ग्राहकांना हवी असणाऱ्या आकारात चटणी आणि इतर उत्पादनांचे पॅकिंग उपलब्ध आहेत. सध्या नसले कुटुंब कोंडी येथेच नवा अत्याधुनिक, परदेशातील खाद्यपदार्थांच्या बाबतीत असणारे मापदंड पाळून शेंगा चटणी निर्मिती करणारे एक नवे युनिट उभा करत आहे. या युनिटमधूननिर्मित होणारी चटणी ही दीर्घकाळ टिकणारी आणि मानवी हस्तक्षेपरहित असणार आहे आणि निर्मिती क्षमताही मोठी असणार आहे. त्यामुळे कोंडीची शेंगाचटणी देशासह परदेशातही सहज चाखायला मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पेट्रोल पंपावरील कामगार कसा बनला उद्योजक? सोलापुरी चटणीला परदेशातून मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल