आता बाहेरून महागडा चीज केक आणण्याचे नो टेन्शन, घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारा चीजकेक

Last Updated:

बऱ्याच जणांना सध्या चीज केक आवडू लागले आहेत. चीज केकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या एका कॅफे व्हॅनचा मालक असलेल्या अभिषेक टाकळे या तरुणाने चीज केक घरच्या घरी कसा बनवता येईल याबद्दल सांगितले आहे.

+
आता

आता बाहेरून महागडा चीजकेक आणण्याचे नो टेन्शन, घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारा चीज केक

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : कोरोना काळापासून घरी केक बनवणे ही प्रत्येकासाठी सोपी गोष्ट बनून गेली आहे. बरेचजण विविध प्रकारचे केक बनवण्यात माहीर झालेत. तर बऱ्याच जणांना सध्या चीज केक आवडू लागले आहेत. त्यातच चीज केकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूरच्या एका कॅफे व्हॅनचा मालक असलेल्या अभिषेक टाकळे या तरुणाने चीज केक घरच्या घरी कसा बनवता येईल याबद्दल सांगितले आहे. खरंतर चीज केक बनवण्याची पद्धत जास्त वेगळी नाही आहे. तरीही सोप्या पद्धतीने कसा चविष्ट चीज केक बनवावा याबद्दलच अभिषेकने सांगितले आहे.
advertisement
चीज केक हे खरंतर एक ग्रीक मिष्ठान्न आहे. चीज केक म्हणजे साधारणपणे बिस्किटांचा वापर करून बनवलेल्या क्रस्टवर अत्यंत मलईदार असा केक असतो. यामध्ये बेकड् चीज केक आणि नॉन बेक चीज केक अशा दोन पद्धतींनी हा चीज केक बनवता येतो. दोन्ही पद्धती जवळपास सारख्याच आहेत. तर दोन्हींची चवही उत्तम असते, असे अभिषेकने सांगितले आहे.
advertisement
काय काय लागतात घटक?
साधारणतः 1 किलोचा बेकड् चीज केक बनवण्यासाठी 375 ग्रॅम चीज क्रीम, 125 ग्रॅम पिठी साखर, 25 ग्रॅम मैदा आणि 125 ग्रॅम बटर, व्हीप क्रीम 50 ग्रॅम आणि व्हेनिला इसेन्स हे घटक लागतात. चीज केकचा बेस बनवण्यासाठी आयसिंगसाठी वापरली जाणारी कॅस्टर साखर वापरली जाते. त्यासोबत बटर आणि डायजेस्टीव्ह बिस्किट्सचा चुरा करून यांचे मिश्रण वापरले जाते, असे अभिषेकने सांगितले आहे.
advertisement
कसा बनवावा चीज केक
1) सुरुवातीला चीज क्रीम एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये बटर टाकावे. तर यामध्ये जितके बटर तितकीच पिठीसाखर टाकून त्यामध्ये इसेन्सचे काही चमचे टाकावेत.
2) बऱ्याच वेळा सामान्य तापमानात चीज टिकून राहत नाही. असे न होण्यासाठी या मिश्रणात मैदा टाकून सर्व मिश्रण एकत्र करुन साधारण 10 मिनिटे फेटून घ्यावे आणि सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
advertisement
3) केकसाठी तळाला सिल्व्हर फाईल लावलेली केक रिंग किंवा साधे भांडे घेऊन तळाला बटर लावून घ्यावे.
4) सुरवातीला चीज केकच्या क्रस्टसाठी कॅस्टर साखर, बटर आणि डायजेस्टीव्ह बिस्किट्सचा चुरा असे मिश्रण साधारण 100 ग्रॅम घेऊन ते भांड्यामध्ये नीट पसरून घ्यावे. त्यानंतर सेट करण्यासाठी ठेवलेले चीज केकचे सर्व बॅटर क्रस्टवर पसरून घ्यावे.
advertisement
5) चीज केक भाजून घेण्यासाठी (बेक करण्यासाठी) डबल बॉयलिंग प्रोसेस खूप उपयोगी ठरते. त्यामुळे एका ट्रेमध्ये केकच्या मिश्रणाचे भांडे घेऊन बाजूने ट्रे मध्ये साधरण अर्धे भांडे बुडेल इतके पाणी ओतावे.
6) चीज केक बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवताना 150° सेल्सियस तापमानाला 45 ते 50 मिनिटे ठेवावा.
7) बेक केलेला चीज केक हा थंड करण्यासाठी एक तास डीप फ्रीझरला ठेवावा.
advertisement
8) त्यानंतर चीज केक कट करून खाण्यासाठी तयार होतो. यावर आपल्याला हव्या त्या पद्धतीचे आयसिंग आपण करू शकतो.
Street Food खावं तर मुंबईतच! फक्त 30 रुपयांत मिळतोय चिकन वडापाव
दरम्यान अशाच सोप्या पद्धतीने नॉन बेक चीज केक देखील आपण बनवू शकतो. तसेच या प्लॅन चीज केकला अजूनच चवदार बनवण्यासाठी विविध टॉपिंग आपण वापरू शकतो. तसेच बॅटरमध्येही थोड्याशा प्रमाणात विविध फिलिंग्ज वापरून या चीज केकची लज्जत अजून वाढवता येते, असेही अभिषेकने सुचित केले आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आता बाहेरून महागडा चीज केक आणण्याचे नो टेन्शन, घरीच बनवा तोंडाला पाणी आणणारा चीजकेक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement