नाशिक शहरातल्या मिसळीला 150 वर्षांची परंपरा आहे, असं अभ्यासक सांगतात. पूर्वी चुलीवरची मिसळ चांगली प्रसिद्ध होती. नंतर कोळशावरची मिसळ आली. पुढे डिझेलच्या भट्ट्यांवर मिसळ बनवली जायची. त्यानंतर गॅस आले आणि त्यावर मिसळ बनवायला लागले. आता पुन्हा एकदा जिथून सुरुवात झाली होती त्याच चुलीवरच्या मिसळला खवय्यांची मागणी वाढली आहे. तो एक ब्रँड तयार झालाय. नाशिकमधली चुलीवरच्या सर्वात फेमस मिसळीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
advertisement
73 वर्षांपासून पुण्यात नंबर 1 आहे ‘ही’ मिसळ, पाहा काय आहे खासियत
नाशिक शहरातील बारदान फाटा परिसरात असलेले साधना चुलीवरची मिसळ ही नाशिक शहरातच नव्हे तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. श्रीराम आमले यांनी 1959 साली ही मिसळ सुरू केली. आज मंगेश आणि राजन आमले हा व्यवसाय सांभळतात. विशेष म्हणजे गेल्या 64 वर्षांपासून इथं चुलीवरची मिसळ मिळते.
ही मिसळ बनवण्यासाठी आमले कुटुंबीयांची खास रेसीपी आहे. मिसळमध्ये मटकी आणि गावठी माठ वापरले जातात. त्यात पडणारे सर्व प्रकारचे मसाले हे आमले कुटुंबीयांचे इनहाऊस मसाले आहेत. त्याचबरोबर मिसळीच्या वर सर्व्ह करण्यात येणारी शेव देखील ते स्वतःच तयार करतात.
या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील जुन्या पद्धतीची आहे. दोन जम्बो पावसोबत ही मिसळ सर्व्ह केली जाते. ही दोन त्याचबरोबर अनलिमिटेड ग्रेव्ही आणि तर्री देखील मिळते. या चविष्ट मिसळपाव बरोबर दहीची एक लहान वाटी व एक मोठा पापड दिला जातो.
कधी द्राक्ष बागेत मिसळ खाल्ली का? ही आहेत नाशिकमधील टॅाप 3 ठिकाणं
श्रीराम आमले यांची दोन मुले मंगेश आमले व राजन आमले हा पूर्ण व्यवसाय सांभाळत आहेत. वडिलोपार्जित रेसिपी ते आजही या ठिकाणी जोपासत आहेत. तुम्हाला तुमच्या परिवारासोबत थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल, तर विकेंड डे आउट साठी साधना चुलीवरची मिसळ हा एक उत्तम पर्याय आहे.
सुट्टीच्या दिवशी या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी व आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी साधना मिसळ एक उत्तम पर्याय आहे. मिसळ बरोबरच मनोरंजनाचे विविध साधन या ठिकाणी विकेंडला सुरू असतात, अशी माहिती साधना मिसळचे मालक मंगेश आमले यांनी दिली.