डोंबीवली : चिकन फ्राय आणि मासे फ्राय हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यात ते प्रसिद्ध आणि चविष्ट असेल तर पाहायलाच नको. दिवा शहरात देखील गेले 16 वर्ष असेच एक चिकन फ्राय आणि मासे फ्रायचे यशोदा चिकन सेंटर नावाचे दुकान प्रसिद्ध आहे. हे दुकान प्रणिता भोईर या चालवतात. त्यांच्या दुकानावर खवय्यांची मोठी गर्दी असते.
advertisement
यशोदा चिकन सेंटरचे प्रमुख वैशिष्ट्य काय?
प्रणिता भोईर यांच्या सासूबाईंनी या दुकानांची सुरुवात केली होती. लग्नानंतर सासुबाई आणि त्या मिळून दुकान चालवत होत्या. परंतु आता तब्येतीच्या कारणाने त्यांना जमत नसल्यामुळे प्रणिता भोईर या त्यांच्या पती सोबत मिळून हे दुकान चालवतात. प्रणिता भोईर यांना सुरुवातीला दुकान चालवताना थोडा त्रास झाला. कारण, मसाल्याचा अंदाज, माशांची कमी जास्त होणारी किंमत, दुकानासाठी लागणारा वेळ या सर्वाचं नियोजन करण्यासाठी साधारण एक वर्ष गेलं. कोणतेही प्रकारचे मांसाहारी फ्राय विकताना त्याचा मसाला महत्त्वाचा असतो. हाच घरी बनवला जाणारा फ्राय मसाला यशोदा चिकन सेंटरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
ऐकावे ते नवलंच! कोल्हापुरात मिळतोय चक्क डायट खाकरा, अनिताबेन यांच्या हाताच्या चवीची खवय्यांना भुरळ
कोण कोणते मिळतात पदार्थ?
या दुकानात चिकन फ्राय, करी पीस, कलेजीपेठा, बांगडा फ्राय, फाळे मासे फ्राय, मांदेली फ्राय, ढोमी मांदेली फ्राय अशा सर्व प्रकारचे मासे फ्राय खायला मिळतील. प्रणिता यांनी बनवलेले मासे फ्राय खाण्यासाठी दुकानासमोर लोकांची कायम गर्दी असते.
दादरमधील प्रसिद्ध मिठाईचं दुकान, तिसरी पिढी करतेय नेतृत्त्व, जपलीय तब्बल 91 वर्षांची परंपरा
'आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासोळी फ्राय, चिकन फ्राय हे पदार्थ 80 रुपयांपासून मिळतात. हे सगळे पदार्थ आम्ही आमच्या आगरी पद्धतीने बनवतो आणि स्वस्तात विकतो म्हणूनच ते लोकांना आवडतात.'असे यशोदा चिकन सेंटरच्या दुकानदार प्रणिता भोईर यांनी सांगितले.
मुलांना शाळेच्या डब्यात द्या सोयाबीनचा पराठा, झटपट तयार करण्यासाठी पाहा रेसिपी
जर तुम्हाला आगरी पद्धतीने बनवलेले मासे फ्राय खाण्याची इच्छा असेल तर आवर्जुन या दिव्यातील यशोदा चिकन सेंटरला भेट द्या. आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या मासोळीची चव घ्या.