TRENDING:

अस्सल शुद्ध शाकाहारी जेवण! गेल्या 80 वर्षांपासून कोल्हापुरातील या हॉटेलने जपलीय परंपरा

Last Updated:

कोल्हापुरकरांनी शाकाहारी जेवणाची परंपरा जपली आहे. अशाच कोल्हापुरातील एका खानावळीची आपण माहिती घेणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निरंजन कामत, प्रतिनिधी 
advertisement

कोल्हापूर : भारतातल्या खाद्य संस्कृतीमध्ये कोल्हापूरचा विशेष उल्लेख होतो. कोल्हापूरच जेवण म्हटलं की एरवी तांबडा पांढरा आपल्या समोर येतो. पण कोल्हापूरची शाकाहारी जेवणाचीही एक विशेष ओळख आहे हे तुम्हाला माहिती आहे का? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि जोतिबा रायाच्या दर्शनाला लाखो भाविकांची रेलचेल असते. काही वेळानं हे दर्शन झालं की भाविकांची पाऊल हळूहळू वळतात ते तांबड्या पांढऱ्या कड. पण कोल्हापुरकरांनी शाकाहारी जेवणाची परंपरा जपली आहे. अशाच कोल्हापुरातील एका खानावळीची आपण माहिती घेणार आहोत. ही खानावळ गेल्या 80 वर्षांपासून नागरिकांना अस्सल घरगुती पद्धतीच शाकाहारी जेवण खाऊ घालते.

advertisement

काय आहे खाणावळीचा इतिहास?

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात असणार महावीर जैन खानावळ. ही खानावळ 1942 साली स्थापना झाली. गेल्या 80 वर्षांपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असणाऱ्या या खानावळीची चौगुले कुटुंबीयांची चौथी पिढी कार्यरत आहे. अनिरुद्ध चौगुले हे आ हे खानावळ चालवत आहेत. सुरुवातीला 1942 मध्ये या ही नुसती खानावळ म्हणून चालवत होते. चार पिढ्यांपासून चालत आलेली एक परंपरा आहे.

advertisement

मुंबईत दाबेली खावी तर इथंच! तब्बल 20 हून अधिक प्रकार, तुम्ही ट्राय केलेत का?

खाद्यपदार्थांत केले गेले बदल

खानावळीचे जसे पिढ्यांमध्ये बदल झाले तर तसे या खानावळीच्या देखरेखीमध्ये आणि व्यवस्थापनामध्येही बदल झालेत. परंतु या खानावळीमध्ये बनवल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांची परंपरागत चालत आलेल्या खाद्यपदार्थांसोबतच आत्ताच्या पिढींना आवडणारे आणि आकर्षित करणारे खाद्यपदार्थही या खाण्यामुळे उपलब्ध होतात संपूर्णपणे शाकाहारी पदार्थ बनवले जातात. भाकरी, शेंगाफ्राय, मसाला वांग, बेसन असे पदार्थ याठिकाणी मिळतात.

advertisement

काय आहे किंमत?

खानावळीच्या किंमतीकडे जर बघायला गेलं तर ज्यावेळी ही खानावळ सुरुवात झाली त्यावेळी अगदी दोन ते तीन रुपये होती. त्यानंतर ती आता 100 रुपयांपर्यंत गेलेली आहे. परंतु या खानावळीबद्दलचा विश्वास आणि आणि इथे बनणाऱ्या सर्व पदार्थांबद्दलच्या चवीचे आकर्षण हे जुन्या ग्राहकांपासून तिने इथे येणाऱ्या नवीन ग्राहकांपर्यंत आहे. या काळामध्ये येणाऱ्या बरेच ग्राहक असे आहेत ज्यांचे पिढ्यान पिढ्या येत आहेत. आणि इथल्या पदार्थांचा ते आस्वाद घेत असतात. इथे मिळणारे खाद्यपदार्थ आणि त्यांची चव तर आहेच पण खाद्यपदार्थांची गुणवत्ताही तितकेच आहे. खानावळी बद्दलची गुणवत्ता ही अतिशय चांगली असल्याचं लोकांकडून सांगितल्या जात आहे.

advertisement

परगावावरून येणाऱ्या नागरिकांच्या पसंतीस उतरलेले

या खानावळीबद्दल विशेष म्हणजे जे परगावावरून महालक्ष्मी दर्शनासाठी येणारे भाविक आहेत त्यांची त्यांची पहिली पसंती ही महावीर खानवाळला आहे. आणि ज्या लोकांना महावीर खानावळ माहिती आहे ते सर्व भाविक या ठिकाणी असलेल्या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाहीत.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
अस्सल शुद्ध शाकाहारी जेवण! गेल्या 80 वर्षांपासून कोल्हापुरातील या हॉटेलने जपलीय परंपरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल