कोकोनट मोदकासाठी लागणारे साहित्य: एक वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धा वाटी मिल्क पावडर, 1/4 कप मिल्कमेड, साजूक तूप, सात ते आठ चमचे केसर घातलेलं दूध, ड्रायफ्रुट्स (तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता) आणि साखर.
Gauri Avahan 2025: 'नवसाची गौराई माझी...', गौरी आगमनसाठी भाविकांची लगबग सुरू
कोकोनट मोदक करण्याची कृती
advertisement
सर्व प्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धा वाटी मिल्क पावडर आणि मिल्कमेड आणि केसरच दूध टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाला साजूक तूप लावून बाजूला ठेवून द्या. त्यानंतर मोदकामध्ये भरण्यासाठी सारणाची तयारी करा. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स एका मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्यामध्ये थोडी साखर घाला. ड्रायफ्रुट्स आणि साखर बारीक करून घ्या. या मिश्रणामध्ये अर्धा चमचा केसर दूध टाकून एकजीव करून घ्या.
एका मोदकाच्या साच्याला थोडसं तूप लावून घ्या. कोकोनटचं मिश्रण साच्यामध्ये भरा. याच मिश्रणाच्या आतमध्ये ड्रायफ्रुट्सचं मिश्रण घालून मोदक तयार करून घ्या. अशा पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्या. गार्निशिंगसाठी तुम्ही मोदकांना वरून केसर देखील लावू शकता. अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे मोदक बनवून तयार होतात.