नवी दिल्ली : अनेकजणांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. परंतु हे दोन्ही पेय जास्त प्रमाणात पिऊ नये असं आहारतज्ज्ञ वारंवार सांगतात. परंतु तुम्हाला माहितीये का, सकाळी लवकर कॉफी पिण्याचे शरिराला काही फायदेही होतात. म्हणूनच कॉफी प्यायचीच असेल तर सकाळी लवकर उठून प्या, असा सल्ला डायटीशियन वागेश शुक्ला देतात. यामुळे आपण दिवसभर छान ऊर्जावान राहाल असं त्यांनी सांगितलं. सकाळी कॉफी पिण्याचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात जाणून घेऊया.
advertisement
सकाळी लवकर कॉफी प्यायल्याने शरीर तातडीनं ऊर्जावान होतं. कॉफीत असलेल्या कॅफेनमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे कोणतंही काम करताना आपण फ्रेश राहतो. या कॉफीमुळे मेटाबॉलिज्मही वाढतं. परिणामी शरिरातल्या कॅलरीचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते, म्हणजेच हळूहळू वजनही कमी होतं. कॅफेनमुळे मानसिक स्थिती सतर्क राहते आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे आपण कोणत्याही मानसिक थकव्याशिवाय काम करू शकता.
हेही वाचा : पुण्यातील कलाकारानं शोधली पार्किन्सन्स आजारावर डान्स थेरपी!
कॉफीत अँटी-ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. वागेश शुक्ला यांनी सांगितलं की, दररोज कॉफी प्यायल्याने हृदयाचं आरोग्यही उत्तम राहतं. शिवाय ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. कॉफी यकृतासाठीही फायदेशीर असते. यामुळे फॅटी लिव्हरची शक्यता कमी होते. तसंच कॉफीमुळे मन प्रसन्न राहतं, सगळा ताण-तणाव दूर होतो.
किती प्रमाणात कॉफी प्यावी?
सकाळी लवकर कॉफी पिणं आरोग्यदायी मानलं जातं. यावेळी एक कप कॉफी प्यायल्याने दिवसभर शरीर ऊर्जावान राहतं. परंतु त्यानंतर चहा, कॉफी पिणं धोकादायक नुकसानदायी मानतात.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.