पुण्यातील कलाकारानं शोधली पार्किन्सन्स आजारावर डान्स थेरपी!

Last Updated:

ऋषिकेश असं या तरुणाचं नाव. त्यांनी जर्मनीतून कथ्थक आणि कंटेम्परेरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर गेली 16 वर्षे ते पुण्यात आवर्तन डान्स फाउंडेशन मार्फत नृत्य शिकवतात.

+
थेरपीमुळे

थेरपीमुळे हा आजार आटोक्यात येण्यास मदत मिळेल असं त्यांनी म्हटलंय.

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आपला छंद किंवा कला आपल्या दुखण्यावर आराम देण्याचं काम करते असं म्हणतात ते काही खोटं नाही. बऱ्याचदा मानात विचारांची गुंतागुंत असली की, एखादं शांत गाणं ऐकल्यावर मनही शांत होतं. पुण्यातल्या एका तरुणाने तर आता पार्किन्सन्स म्हणजेच कंपवातावर डान्स थेरपी तयार केली आहे. या थेरपीमुळे हा आजार आटोक्यात येण्यास मदत मिळेल असं त्यांनी म्हटलंय.
advertisement
ऋषिकेश असं या तरुणाचं नाव. त्यांनी जर्मनीतून कथ्थक आणि कंटेम्परेरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर गेली 16 वर्षे ते पुण्यात आवर्तन डान्स फाउंडेशन मार्फत नृत्य शिकवतात. पार्किन्सन्स आजारात आपल्या दैनंदिन जीवनातील हालचालींवर परिणाम होतो. 50 ते 90 वयोगटातील व्यक्तींना या आजाराचा मोठा धोका असतो. या सर्वांसाठी त्यांनी नृत्य प्रशिक्षण सुरू केलंय. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सोमवार ते शुक्रवार 130 लोक नृत्य शिकण्यासाठी येतात.
advertisement
त्यांचा क्लास हा केवळ पुण्यातच नाहीये, तर कोल्हापूर, बारामती, बीड, बंगळूरू, चेन्नई, हैद्राबाद, इत्यादी ठिकाणी हे क्लास आहेत. यासाठी एकूण 16 जण काम करतात.
महत्त्वाचं म्हणजे आवर्तन डान्स फाउंडेशनच्या माध्यमातून पार्किन्सन्सवर मोफत नृत्य थेरपी घेता येते. दरम्यान, जर एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर थरथरणं, स्नायुंमधील कडकपणा, चालण्यात, हालचाल करण्यात येणाऱ्या अडचणी आणि असंतुलन यांसारखी लक्षणं दिसून येतात. हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक शक्ती आणि सामाजिक वातावरणही फार महत्त्वाचं असतं, अशी माहिती सेंटर ऑफ कंटेम्परेरी डान्स संस्थेचे चालक ऋषिकेश पवार यांनी दिली.
मराठी बातम्या/हेल्थ/
पुण्यातील कलाकारानं शोधली पार्किन्सन्स आजारावर डान्स थेरपी!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement